हिंगोली : ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांच्या वेतनातील त्रुटी दुर करण्याच्या तसेच अन्य मागण्यांसाठी २ जुलैपासून जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे बुधवारी पहिल्या दिवशी सर्व ग्रामपंचायतीमधील कामकाज ठप्प झाले. राज्यातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दुर करण्यात याव्यात, ग्रामपंचायत स्तरावर नरेगासाठी स्वतंत्र यंत्रणा तयार करावी, कंत्राटी ग्रामसेवकांचा कालावधी ते सेवेत रुजू झाल्यापासून धरण्यात यावा, २० ग्रामपंचायतीमागे एक विस्तार अधिकारी पद निर्माण करण्यात यावे, ग्रामसेवकांना दरमहा ३ हजार रूपये प्रवास भत्ता पगारासोबत देण्यात यावा, सर्व संवर्गातील बदलीचे धोरण एकच ठेवावे, यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेच्या वतीने २ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार हिंगोली येथील पंचायत समितीसमोर तालुक्यातील १११ गावांमधील ग्रामसेवक सकाळी जमले. त्यानंतर सर्व ग्रामसेवकांनी त्यांच्याजवळील रबरी शिक्के व ग्रा. पं. चे साहित्य गटविकास अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर दिवसभर पं. स. कार्यालय परिसरात धरणे आंदोलन केले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शिवाजी खरात, राजेश किलचे, झरकर, देशमुख, शिंदे आदींनी सहभाग नोंदविला. औंढ्यात कामकाज ठप्पऔंढा नागनाथ: तालुक्यातील सर्व ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांनी बुधवारी राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलनास सुरूवात केली आहे. कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन असणारे रबरी शिक्के व कपाटाच्या चाव्या ग्रामसेवक संघटनेकडे सुपूर्द केल्या. यावेळी कार्यालयीन उपयोगामध्ये येणारे ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांचे रबरी शिक्के व कपाटाच्या चाव्या संघटनेचे तालुकाध्यक्ष दिलीप पांढरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. या आंदोलनात तालुक्यातील कंत्राटी ग्रामसेवक वगळून सर्व ग्रामसेवकांनी सहभाग नोंदविला असल्याची माहिती दिलीप पांढरे यांनी दिली. यावेळी संघटनेचे सचिव मुकूंद घनसावंत, जी. पी. हलबुरगे, महेश थोरकर, विष्णू भोजे, ग्रामविकास अधिकारी रमेश मोरे, चव्हाण, माळे, गजानन डुकरे, चौधरी, रवी काळे, अनंत जाधव, राजू बर्वे, सुभाष जवंजाळ, विवेक साळवे, भाऊसाहेब भुजबळ, कुटे, डुकरे, निकस, सावळे, देशमुख, लोखंडे, लासीनकर, गोरे, खाडे, इपकलवार, मुंडीक, चव्हाण, संतोष राठोड, तेलगोटे, खिस्ते आदींची उपस्थिती होती. सेनगावात धरणे आंदोलनसेनगाव : विविध प्रलंबित मागण्यांसाठी सेनगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने बुधवारी येथील पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करीत कामबंद आंदोलनास सुरूवात करण्यात आली.या आंदोलनात जिल्हा कोषाध्यक्ष राजू खिल्लारी, तालुकाध्यक्ष डी. एन. इंगोले, सचिव संतोष मेनकुंदळे, पी. बी. सरकटे, आर. के. पट्टेबहाद्दूर, जी. एम. सुरशे, सरनाईक, सोनवणे, जी. एन. बेगांळ, सोनवणे, जी. बी. चव्हाण, के. ए. चेके आदींसह ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)
ग्रामसेवकांचे कामबंद आंदोलन सुरू
By admin | Updated: July 3, 2014 00:23 IST