जालना: बदनापूर तालुक्यातील कुसळी येथील ग्रामसेवक संभाजी कटारे यांना जागा नामांतर करून देण्यासाठी ५०० रूपयांची लाच स्वीकारताना सोमवारी जालना जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात रंगेहाथ पकडण्यात आले.कुसळी येथील तक्रारदार यांचे आईच्या नावे असलेला प्लॉट नामांतर करून नमुना क्र ८ मध्ये दाखला देण्यासाठी ग्रामसेवक कटारे याने ५०० रूपयाची लाच मागितली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रार दाराने १ आॅगस्ट रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करून ३ आॅगस्ट रोजी या कार्यालयाने सापळा लावला होता. जिल्हा परिषदेच आवारात कटारे याला पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याता आला आहे. (प्रतिनिधी)
ग्रामसेवकास लाच घेताना पकडले
By admin | Updated: August 5, 2015 00:33 IST