शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकाला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:46 IST

:वडीलोपार्जित प्लॉट फेरफार करुन नावावर करुन देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारणाºया हिमायतनगर तालुक्यातील कार्ला येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड:वडीलोपार्जित प्लॉट फेरफार करुन नावावर करुन देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्विकारणाºया हिमायतनगर तालुक्यातील कार्ला येथील ग्रामसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले़तक्रारदाराची हिमायतनगर तालुक्यातील मौजे कार्ला येथील वडीलोपार्जित प्लॉटचा फेरफार करुन नमुना नंबर आठवर तक्रारदार यांच्या नावाची नोंद करण्यासाठी ग्रामसेवक बाबूराव राजाराम तावडे यांनी १२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाशी संपर्क साधून तक्रार दिली़ १८ आॅगस्ट रोजी हदगांव येथे पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, ग्रामसेवकाने बारा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले़ त्यानंतर १९ आॅगस्ट रोजी हिमायतनगर येथील रहिम कॉलनी परिसरात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचला़ यावेळी ग्रामसेवक बाबूराव तावडे यांनी पंचासमक्ष तक्रारदाराकडून दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारली़ त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले़ याप्रकरणी बाबूराव तावडे यांच्या विरोधात हिमायतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या कारवाईत पोलिस अधीक्षक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक बी़एल़पेडगांवकर, कपील शेळके, पोना़साजीद अली, बाबू गाजुलवार, एकनाथ गंगातीर्थ, नरेंद्र बोडके यांचा समावेश होता़