राणीउंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव या गावी ग्रामसचिवालयाची आवश्यकता निर्माण झाली आहे.राणीउंचेगाव हे तालुक्यातील महसूल मंडळाचे ठिकाण आहे. या महसूल मंडळांतर्गत सहा सज्जातील १८ गावांचा समावेश आहे. तसेच कृषी विभागाचे कृषी मंडळाचे ठिकाण देखील राणीउंचेगाव आहे. या कृषी मंडळाच्या अंतर्गत परिसरामधील २९ गावांचा समावेश आहे. गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, ३३ केव्ही चे सबस्टेशन, बॅँकाच्या शाखा कार्यरत आहे. तसेच गावामध्ये आठवडी बाजार देखील चांगल्या प्रकारे भरत आहे.ग्रामपंचायती १३ सदस्य संख्या असलेल्या या गावची लोकसंख्या ९ हजाराच्या पुढे आहे. घनसावंगी तालुक्यामध्ये उपबाजारपेठेचे असलेले हे गाव विकासाच्या सर्वच क्षेत्रामध्ये भरभराटीला येवू पाहात आहे. गावाच्या विकासामध्ये भर घालण्यासाठी आवश्यकता आहे, ती फक्त एका सुसज्ज इमारत असलेल्या ग्राम सचिवालयाची एका स्वतंत्र सुसज्ज इमारतीमध्ये ग्राम सचिवालयाची निर्मिती झाल्यास विविध विभागाचे कार्यालयाचे ठिकाण एका ठिकाणी येईल आणि यामुळे नागरिकांची कामे कमी वेळेमध्ये पूर्ण होतील. त्याचबरोबर इमारतीमध्ये व्यवसायाच्या दृष्टिकोनातून लहान, मोठ्या गाळ्यांची उभारणी केल्यास गावातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाची संधी प्राप्त होऊ शकेल. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
ग्रामसचिवालय गरजेचे
By admin | Updated: August 12, 2014 01:56 IST