शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.कर्मचा-यांची परवड थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:54 IST

वाळूज महानगर : आठ महिन्यांपासून विनावेतन काम करणाºया ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या किमान वेतनासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला सव्वातीन कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. किमान वेतनासाठी अनुदान मिळाल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचा-यांची परवड थांबणार आहे.

शेख महेमूद ।लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : आठ महिन्यांपासून विनावेतन काम करणाºया ग्रामपंचायत कर्मचा-यांच्या किमान वेतनासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला सव्वातीन कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. किमान वेतनासाठी अनुदान मिळाल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचा-यांची परवड थांबणारआहे.शासनाकडून ग्रामपंचायतीच्या कर्मचाºयांना किमान वेतनासाठी ग्रामपंचायतीला अनुदान देण्यात येते; मात्र अनुदानाची रक्कम ग्रामपंचायतींना वेळेवर मिळत नसल्यामुळे गावात पाणीपुरवठा, स्वच्छता, साफ-सफाई व कार्यालयीन कामकाज करणाºया हजारो कर्मचाºयांना दरमहा नियमितपणे वेतन मिळत नाही. काम करूनही प्रत्येक महिन्यात वेतन मिळत नसल्यामुळे कर्मचाºयांना उधारी-उसनवारी करून कुटुंबाची गुजराण करावी लागतआहे.महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली असून, वेतन मिळत नसल्यामुळे कुटुंबाचे पालन-पोषण करताना ग्रामपंचायत कर्मचा-यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वेतन अदा करण्यात यावे, यासाठी ग्रामपंचायतीकडे सतत पाठपुरावा करूनही अनुदान प्राप्त झाले नसल्याचे कारण दाखवून या कर्मचाºयांना ग्रामसेवक, सरपंच व पदाधिकारी वेतन देण्यास नकार देत असल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. वाळूज परिसरातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या रांजणगाव, जोगेश्वरी, घाणेगाव, वाळूज आदी मोजक्याच ग्रामपंचायती कर्मचाºयांना दरमहा वेतन अदा करीत असतात. या सक्षम ग्रामपंचायती व काही मोठ्या ग्रामपंचायतींचा अपवाद वगळता जिल्ह्यातील लहान-सहान ग्रामपंचायतींच्या कर्मचाºयांना वेतनासाठी महिनोन्महिने प्रतीक्षा करावी लागत असते. थकीत वेतनासाठी कर्मचाºयांनी आंदोलनाचे हत्यार उपसल्यानंतर काही ग्रामपंचायती ग्रामनिधीतून कर्मचाºयांना काही प्रमाणात वेतन अदा करीत असतात.ग्रामपंचायत कर्मचाºयांना दरमहा नियमितपणे वेतन अदा करण्यात यावे, यासाठी  राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश गायके, ताजू मुल्ला, अशोक पाटेकर, उमेश जाधव, नाना इंगळे, अशोक दिवेकर, माणिक शेजूळ, गजानन फरकाडे आदींचा प्रशासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. आता अनुदान प्राप्त झाल्यामुळे कर्मचाºयांचे थकीत वेतन देण्यात यावे, अन्यथा संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश गायके व पदाधिका-यांनी दिला आहे.