शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीत होणार रिचार्ज

By admin | Updated: July 15, 2014 00:51 IST

शिरूर अनंतपाळ : ग्रामपंचायत कार्यालयात सुरु झालेले संग्राम कक्ष अधिकाधिक लोकाभिमुख व्हावेत, यासाठी शिरूर अनंतपाळ पंचायत समितीने संग्राम कक्षास कॉमन सर्व्हिस सेंटर बनविण्यास प्रारंभ केला आहे़़

शिरूर अनंतपाळ : ग्रामपंचायत कार्यालयात सुरु झालेले संग्राम कक्ष अधिकाधिक लोकाभिमुख व्हावेत, यासाठी शिरूर अनंतपाळ पंचायत समितीने संग्राम कक्षास कॉमन सर्व्हिस सेंटर बनविण्यास प्रारंभ केला आहे़़ त्यामुळे आता ग्रामपंचायतीतही ‘मोबईल’ रिचार्ज होणार आहे़ तालुक्यातील कानेगाव, येरोळ या दोन गावात ही सुविधा सुरु झाली आहे़ ग्रामीण भागात मोबाईलचा वाढता वापर पाहता त्यास मिळणारे बॅलेन्स रिचार्ज मात्र तोकडे आहेत़ यासाठी संग्राम कक्ष लोकाभिमुख व्हावेत यासाठी शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बालाजी पोतदार यांनी सोमवारी तालुक्यातील सर्व संगणक परिचराची बैठक घेऊन संग्राम कक्ष कॉमन सर्व्हिसेस सेंटर बनविण्यासाठी सर्व अद्यावत संगणकीय माहिती दिली़ त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात विविध स्वरूपाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे़ ग्रामीण भागातील लोकांना आता मोबाईलचे रिचार्ज करण्यासाठी शहरात किंवा मोठ्या गावात जाण्याची गरज पडणार नाही़ त्यामुळे संग्राम कक्ष अधिक लोकाभिमुख बनणार आहेत़ शिवाय ते कार्यालयीन वेळेत दिवसभर सुरु राहणार आहेत़ मोबाईल बॅलेन्स रिचार्जबरोबरच सर्व टी़व्ही़चे रिचार्ज होणार, पॅन कार्ड नोंदणी, लाईट बिल भरणा, फोन बिल भरणा तसेच आधार नोंदणी करणे आदी सर्व आवश्यक सुविधांचा लाभ कॉमन सर्व्हिसेस सेंटरमधून मिळणार आहे़ (वार्ताहर)शिरूर अनंतपाळ तालुक्यात एकंदर ४३ ग्रामपंचायती असून २३ ग्रामपंचायतीमध्ये ब्रॉडबँड सेवा सुरु असून, इतर २० ग्रामपंचायतीमध्ये नेटसेटरद्वारे संगणकीकृत आहेत़ त्यामुळे येरोळ, कानेगाव, तळेगाव, नागेवाडी, साकोळ येथे चार दिवसात तर महिनाभरात सर्व ४३ गावातही या सुविधा सुरु होणार आहे़ त्यामुळे नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार आहे़, असेही अभंगे यांनी यावेळी सांगितले़