शिरूर अनंतपाळ : ग्रामपंचायत कार्यालयात सुरु झालेले संग्राम कक्ष अधिकाधिक लोकाभिमुख व्हावेत, यासाठी शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मोहन अभंगे यांनी संग्राम कक्षास कॉमन सर्व्हिस सेंटर बनविण्यास प्रारंभ केला असल्याने आता ग्रामपंचायतीतही ‘मोबाईल’ रिचार्ज होणार असून, तालुक्यातील कानेगाव, येरोळ या दोन गावात ही सुविधा सुरु झाली आहे़ उर्वरित सर्वच गावात महिनाभरात ही सुविधा सुरु केली जाणार आहे़ ग्रामीण भागात मोबाईलचा वाढता वापर पाहता त्यास मिळणारे बॅलेन्स रिचार्ज मात्र तोकडे आहेत़ यासाठी संग्राम कक्ष लोकाभिमुख व्हावेत यासाठी शिरूर अनंतपाळ पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बालाजी पोतदार यांनी सोमवारी तालुक्यातील सर्व संगणक परिचराची बैठक घेऊन संग्राम कक्ष कॉमन सर्व्हिसेस सेंटर बनविण्यासाठी सर्व अद्यावत संगणकीय माहिती दिली़ त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयात विविध स्वरूपाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे़ ग्रामीण भागातील लोकांना आता मोबाईलचे रिचार्ज करण्यासाठी शहरात किंवा मोठ्या गावात जाण्याची गरज पडणार नाही़ त्यामुळे संग्राम कक्ष अधिक लोकाभिमुख बनणार आहेत़ शिवाय ते कार्यालयीन वेळेत दिवसभर सुरु राहणार आहेत़मोबाईल बॅलेन्स रिचार्जबरोबरच सर्व टी़व्ही़चे रिचार्ज होणार, पॅन कार्ड नोंदणी, लाईट बिल भरणा, फोन बिल भरणा तसेच आधार नोंदणी करणे आदी सर्व आवश्यक सुविधांचा लाभ कॉमन सर्व्हिसेस सेंटरमधून मिळणार आहे़ (वार्ताहर)महिनाभरात ४३ गावांत़़़शिरूर अनंतपाळ तालुक्यात एकंदर ४३ ग्रामपंचायती असून २३ ग्रामपंचायतीमध्ये ब्रॉडबँड सेवा सुरु असून, इतर २० ग्रामपंचायतीमध्ये नेटसेटरद्वारे संगणकीकृत आहेत़ त्यामुळे येरोळ, कानेगाव, तळेगाव, नागेवाडी, साकोळ येथे चार दिवसात तर महिनाभरात सर्व ४३ गावातही या सुविधा सुरु होणार आहेत, असेही अभंगे यांनी यावेळी सांगितले़
ग्रामपंचायतीत मिळणार रिचार्ज
By admin | Updated: July 11, 2014 00:58 IST