जालना: ग्रामपंचायत सेवकास मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दोघांविरूद्ध बुधवारी टेंभूर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जाफराबाद तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील मनोहर वसंतराव जाधव हे ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा शिपाई आहे. बुधवारी चार वाजेच्या सुमारास ते गावात पाणी सोडण्यासाठी वाल जवळ गेले असता. त्याचवेळी एका विनानंबरच्या ट्रॅक्टरचे चाक वाल वरून गेल्याने, वाल तुटला. तेव्हा जाधव हे ट्रॅक्टर चालकाशी बोलत असतानाच गावातील सुरेश नानगुडे व विष्णू नानगुडे या दोघांनी जाधव यांना मारहाण करून धमकी दिली असल्याची तक्रार जाधव यांनी टेंभूर्णी पोलिस ठाण्यात दिली. यावरुन वरील दोघांविरूद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास जमादार काकडे हे करीत असल्याची माहिती ठाणे अमंलदार आर. आर. भावले यांनी दिली.भोकरदनमध्ये घरफोडीभोकरदन शहरातील पुखराज नगर येथील शंकर पैठणकर हे बाहेर गावी गेले असता त्याचे घरफोडून चोरट्यांनी १२ हजारांचे साहित्य चोरून नेले. तसेच शेजारील कौतिक गायकवाड यांच्या घरीही चोरी केली. ही घटना मंगळवारी रात्री घडली.भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)
ग्रामपंचायत शिपायाला मारहाण, दोघांवर गुन्हा
By admin | Updated: July 6, 2016 23:44 IST