शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत अन् व्यापारी गटात चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2017 23:59 IST

उदगीर : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे़

उदगीर : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत प्रचार आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे़ त्यात सोसायटी गटावर अनेकांचे लक्ष असले, तरी ग्रामपंचायत व व्यापारी गटात मोठी चुरस निर्माण झाली आहे़कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांसाठी होऊ घातलेली निवडणूक आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे़ २ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने काँग्रेस व भाजप प्रणित दोन्ही पॅनलनी प्रचाराला गती दिली आहे़ काँग्रेस प्रणित पॅनलने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची सभा घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे़तर दुसरीकडे भाजप प्रणित पॅनलनेही माजी आमदार गोविंद केंद्रे, जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, भारत चामे, जिल्हा परिषद सदस्य बस्वराज पाटील कौळखेडकर, शंकरराव रोडगे, बस्वराज बिरादार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे, प्रा़ प्रवीण भोळे यांच्या उपस्थितीत मतदारांची सभा घेतली़ त्यात शेतकरी विकासासाठी भाजप प्रणित पॅनलच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ या सभेद्वारे काँग्रेस प्रणित पॅनलला शह देण्याचा प्रयत्न केला गेला़दरम्यान, नेहमीप्रमाणे सोसायटी गटात सर्वाधिक चुरस पहायला मिळते़ मात्र, यावेळी व्यापारी व ग्रामपंचायत गटातही मोठी रंगत निर्माण झाली आहे़ व्यापारी गटात माजी सभापती शिवाजी हुडे यांचे चिरंजीव तथा पालिकेचे बांधकाम सभापती रिंगणात आहेत़ तर त्यांना शह देण्यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांचे चिरंजीव कैलास पाटील यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे़ या दोन उमेदवारांमुळे चुरस वाढली आहे़ दरम्यान, ग्रामपंचायत गटातून काँग्रेस प्रणित पॅनलद्वारे मुन्ना पाटील रिंगणात आहेत़ ते सभापती पदाचे उमेदवार असल्याने यावेळी या गटातही लक्षवेधी लढत होत आहे़