शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

‘ईपॉस’द्वारेच मिळणार धान्य

By admin | Updated: April 8, 2017 23:44 IST

जालना : जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानांतून आता ई पॉस मशीनद्वारेच होणार असून, आठ तालुक्यांत येत्या चार दिवसांत या मशीनचे वाटप करण्यात येणार आहेत.

जालना : जिल्ह्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानांतून आता ई पॉस मशीनद्वारेच होणार असून, आठ तालुक्यांत येत्या चार दिवसांत या मशीनचे वाटप करण्यात येणार आहेत.जिल्ह्यासाठी १२८६ ई पॉस मशीन प्राप्त झाल्या असून, एप्रिल महिन्याचे धान्य या मशीनद्वारे वाटप होणार आहे. कॅशलेस व्यवहार व बायोमेट्रिकद्वारे धान्य वाटपासाठी ईपॉस मशीन महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. यासाठीचे प्रशिक्षण स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात येणार असून, यावेळी दुकानदारांना काही शंका अथवा प्रश्न असल्याचे त्याचे निराकरण करण्यात येईल, असे पुरवठा अधिकारी राजीव नंदकर यांनी सांगितले. या मशीनमुळे धान्य वितरणात पारदर्शकता येऊन प्रक्रिया सुलभ होईल, असा विश्वास नंदकर यांनी व्यक्त केला. यासाठीचे प्रशिक्षण जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात येणार आहे. मशीन वाटप कार्यक्रमाचे नियोजन पुरवठा विभागाने केले आहे. यात दहा एप्रिल रोजी जाफराबाद येथे सकाळी नऊ वाजता, बदनापूर येथे दुपारी दोन वाजता तर ११ एप्रिल रोजी अंबड येथे नऊ वाजता, घनसावंगी येथे दोन वाजता, १२ एप्रिल रोजी भोकरदन येथे नऊ वाजता तर मंठा येथे दुपारी दोन वाजता, १३ एप्रिल रोजी परतूर येथे सकाळी नऊ वाजता तर जालना येथे दुपारी दोन वाजता या मशीनचे वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)