शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धान्य गोदाम, बंधारे, वाळूठेकेही तपासले

By admin | Updated: July 5, 2017 23:33 IST

परभणी : जिल्ह्यातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या विधानमंडळ अंदाज समितीच्या पथकाने बुधवारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेची धान्य गोदामे, रेशन दुकान, वाळू ठेक्यांसह बंधाऱ्यांचीही पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्ह्यातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी आलेल्या विधानमंडळ अंदाज समितीच्या पथकाने बुधवारी सार्वजनिक वितरण व्यवस्थेची धान्य गोदामे, रेशन दुकान, वाळू ठेक्यांसह बंधाऱ्यांचीही पाहणी करीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ अनियमितता असणाऱ्या ठिकणी जाब विचारत कामांचा आढावा घेतला़ त्यामुळे बुधवारचा संपूर्ण दिवस अधिकाऱ्यांसाठी ताणाताणीचा ठरला़परभणी जिल्ह्यातील विकास कामांची पाहणी करण्यासाठी विधान मंडळ अंदाज समितीचे पथक दोन दिवसांच्या मुक्कामी आले आहे़ आ़ उदय सामंत पथकप्रमुख असलेल्या या पथकात २५ आमदारांचा समावेश असला तरी ७ आमदार परभणी येथे पाहणीसाठी दाखल झाले आहेत़ तसेच मंत्रालयस्तरावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा परभणीत पोहोचला आहे़ बुधवारी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात विकासकामांची आढावा बैठक घेण्यात आली़ साधारणत: दोन तास ही बैठक चालली़ त्यानंतर या पथकाचे दोन गट तयार करण्यात आले़ समितीप्रमुख आ़ उदय सामंत, आ़ शशिकांत खेडेकर, आ़ सदा सरवणकर, आ़ मिलिंद माने आणि विधानमंडळाचे अव्वर सचिव विजय कोमटवार यांचे पथक दुपारी १२ च्या सुमारास गंगाखेड तालुक्यामध्ये पाहणीसाठी पोहोचले़ सुरुवातीला गंगाखेड शुगर इंडस्ट्रीजमध्ये डिस्टलरी प्रकल्पाची पाहणी केली़ त्यानंतर गंगाखेड शहरातील शासकीय धान्य गोदाम, शहरालगत रेल्वे पुलाजवळ होत असलेला वाळूचा उपसा, शहरातील बसस्थानक व रेल्वेस्थानक परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे बांधकाम आदी कामांची पाहणी करण्यात आली़ त्यानंतर धारासूरमार्गे हे पथक मुळी येथे पोहोचले़ मुळीचा बंधारा, मुळी येथील रेशन दुकानाची पाहणीही पथकाने केली़ सायंकाळी ६़४५ वाजेच्या सुमारास आमदार आणि अधिकाऱ्यांचा ताफा सोनपेठ तालुक्यातील शिर्शी पुलाच्या पाहणीसाठी रवाना झाला होता़ दुसरे पथक सेलू, मानवत, पाथरी या तालुक्यांमध्ये पोहोचले़ या पथकामध्ये आ़ विरेंद्र जगताप, आ़ चरण वाघमारे, आ़ संजय कदम आणि बाळासाहेब मुरकुटे यांचा समावेश होता़ सेलू शहरातील धान्य गोदामाला पथकाने भेट दिली़ स्टॉक रजिस्टर, तांदूळ व गव्हाची प्रतवारी तपासली़ आमदार महोदयांनी विविध प्रश्न उपस्थित करताच गोदामपालाची फजिती झाली़ एफसीआयकडून धान्य खरेदी केल्यानंतर ते तपासण्यांसाठी ग्रेडरची नियुक्ती केली का? असा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला़ धान्य कट्ट्यांचे वजनही बरोबर आहे की नाही? याची शहानिशा पथकाने केली़ त्यानंतर हादगाव पावडे येथील स्टोन क्रेशर, पिंपरी खु़ येथील दूधना नदीतील वाळू घाट, निम्न दूधना प्रकल्पाच्या कालव्यांची तपासणी पथकाने केली़ कालव्याच्या कामासाठी मातीमिश्रीत वाळूचा वापर होत असल्याचे समितीला आढळले़