शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांकडून १४ दुचाकी हस्तगत

By admin | Updated: June 18, 2017 00:58 IST

औरंगाबाद : शहराच्या वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरणाऱ्या आंतरजिल्हा दोन चोरट्यांना गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : शहराच्या वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरणाऱ्या आंतरजिल्हा दोन चोरट्यांना गुन्हे शाखेने नुकतीच अटक केली. या चोरट्यांकडून चोरीच्या तब्बल १४ दुचाकी जप्त करण्यात यश आले. योगेश ऊर्फ बाळू नागनाथ बाण (२२, रा. बाणाची वाडी, ता. परतूर, जि. जालना) आणि नाथा गौतम भदरगे (रा. संकनपुरी, ता. परतूर), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. गुन्हा शाखेकडून मिळालेली माहिती अशी की, शहराच्या वेगवेगळ्या भागांतून दुचाकी चोरणारे आरोपी आष्टी येथे असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी याविषयी कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. संतोष सोनवणे आणि पथक स्थापन केले. या पथकाने तपास करून दोन्ही आरोपींना पकडले. त्यावेळी त्यांच्याकडून चोरीच्या दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. त्यांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांत दडवून ठेवलेल्या आणखी चार मोटारसायकली पोलिसांच्या हवाली केल्या. ४ लाख २० हजार रुपयांच्या चोरीच्या तब्बल १४ दुचाकी आजपर्यंत त्यांच्याकडून जप्त करण्यात पोलिसांना यश आले. या आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. त्या गुन्ह्यात ते सध्या अटकेत आहेत. पोहेकॉ. सोनवणे, विश्वास शिंदे, सुधाकर शिंदे, योगेश गुप्ता, सिद्धार्थ थोरात, नंदलाल चव्हाण, लालखाँ पठाण, धर्मराज गायकवाड यांनी ही कारवाई केली.