जालना : घंटागाड्या प्रभागात येत नसल्याच्या तक्रारींवर आता कमी होण्याचे चिन्हे आहेत. नगर पालिकेने १५ घंटाड्या तसेच इतर कचरा वाहतूक करणाऱ्या ३१ वाहनांवर जीपीएस यंत्रणा बसविली आहे. यामुळे नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांसह सर्वसामान्यांनाही आता घंटागाडी नेमकी कोठे आहे, याची माहिती मिळणे सुलभ होणार आहे. नगर पालिकेच्या घंटागाड्या असल्या तरी त्या अनेक कारणांमुळे प्रभागात येत नाहीत. त्यामुळे नागरिकांना कचरा कोठे टाकावा असा प्रश्न पडतो. असा नागरिकांचा प्रश्न सुटणार आहे. नगर पालिकेने मुंबई येथील एका सॉफ्टवेअर कंपनीकडून स्वच्छता विभागातील वाहनांवर अत्याधुनिक अशी जीपीएस यंत्रणा कार्यान्वित केली आहे. जीपीएस सिस्टीमुळे घंटागाडी नेमकी कोठे आहे, आपल्या प्रभागात कधी पोहचू शकेल याची माहिती नागरिकांना मिळणार आहे. जालना पालिकेकडे १५ घंटागाड्या व इतर दहा पेक्षा अधिक कचरा वाहतूक करणारी वाहने आहेत. सर्वच वाहनांवर जीपीएस असल्याने सर्व वाहनांचा एकमेकांशी समन्वय राहण्यास मदत होणार आहे. (प्रतिनिधी)
स्वच्छता विभागाच्या ३१ वाहनांवर बसविले जीपीएस
By admin | Updated: May 3, 2017 00:24 IST