शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदांची तयारी जोरात

By admin | Updated: August 10, 2014 23:50 IST

गोविंदांची तयारी जोरात

भास्कर लांडे हिंगोलीएकमेकांच्या आधारावर मनोरे रचून दहीहंडी फोडण्यासाठी हिंगोलीतील गोविंदांनी जोरात तयारी सुरू केली आहे. गोकुळाष्टमीला आठ दिवसांचा अवधी असल्याने शिंकाळ्यातील दही खाण्यासाठी व्यायामशाळेतील पहेलवान गोविंदा मनोऱ्यावर मनोरे रचून सराव करताना दिसत आहेत. राज्यभरात मोठ्या उत्साहात गोकुळाष्टमीचा सण साजरा केला जातो. गणेशोत्सवाप्रमाणे या सणाची महानगरात विशेष तयारी केली जाते. हळूहळू ग्रामीण भागातही हे लोण पोहोचल्याने हिंगोली त्याला अपवाद राहिला नाही. अलिकडच्या पाच वर्षांपासून हिंगोलीत दहीहंडीची संख्या वाढताना दिसते. पूर्वी बद्रीनारायण मंदिराची एकमेव दहीहंडी होती. चार मनोऱ्याच्या येथील दहीहंडीला जवळपास ३० वर्षांपासूनची परंपरा आजतागायत सुरू ठेवली. त्यानंतर पोस्ट आॅफीस रोडवर सात वर्षांपूर्वी दहीहंडी सुरू झाली. दोेन्ही दहीहंडी फोडण्यासाठी हनुमान व्यायाम शाळेतील मल्लांनी आठ दिवसांपूर्वी सरावास सुरूवात केली. मुळात पहेलवान असल्याने येथील गोविंदांना तयारीस भरपूर वेळ देण्याची आवश्यकता भासत नाही. अनुभवी मल्ल आणि पुर्वानुभव असताना चढणे, उतरणे, तोल सांभाळणे आदी सराव गोविंदा व्यायामशाळेत करतात. दुसरीकडे राजस्थान व्यायामशाळेच्या दहीहंडीसाठी येथील गोविंदा सरावाला लागले. यंदाचे पाचवे वर्ष असल्याने येथील गोविंदांना चार मनोरे तयार करावे लागणार आहेत. येथील गोविंदांत पहेलवानांचा अधिक समावेश असल्याने कठोर मेहनतीची गरज नसल्याचे पहेलवान सागर खंडेलवाल यांनी सांगितले. मध्यंतरी दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा नव्याने भुषण देशमुख यांनी शिवाजी नगरवासियांचा उत्साह वाढवला. उंच मनोरे आणि स्पर्धांपेक्षा शिस्तबद्ध पद्धतीने दहीहंडी फोडण्याचे वैशिष्ट आजही येथे जपले जाते. येथील गोविंदा जिम्नॅशियमचे खेळाडू असल्याने चार मनोऱ्याची दहीहंडी फोडण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागणार नाही. अधिक उत्साह आणि सार्वजनिक उपक्रम म्हणून नांदेड येथील गोविंदा पथक आणण्यासाठी बोलणी सुरू असल्याचे देशमुख म्हणाले. शिवाय गाडीपुरा, रिसाला बाजार, मारवाडी गल्ली, मंगळवारा, टाले हॉल, गोलंदाज गल्ली, महात्मा गांधी चौक, उत्साहात दहीहंडी फोडतात.