शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

जमिनीचे शासकीय मूल्य वाढणार

By admin | Updated: March 20, 2016 01:05 IST

रामेश्वर काकडे, नांदेड मुुद्रांक शुल्क विभागाकडून जमिनीचे शासकीय मूल्य येत्या १ एप्रिलपासून १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

रामेश्वर काकडे, नांदेड मुुद्रांक शुल्क विभागाकडून जमिनीचे शासकीय मूल्य येत्या १ एप्रिलपासून १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जमिनीची खरेदी-विक्री करणाऱ्यांना मुद्रांक शुल्काचा अधिकचा आर्थिक भूर्दंड सोसावा लागणार आहे. जमिनी, प्लॉटींग तसेच मोकळ््या भूखंडाचा खरेदी-विक्रीचा व्यवहार पारदर्शक व्हावा, यासाठी शानसाच्या मुद्रांक शुल्क विभागाकडून २००२ पासून संगणकप्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. ती करण्यापूर्वी अनेकदा एकाच प्लॉटची खरेदी-विक्री दोन ते तीनवेळा होण्याचा प्रकारही घडत होता. त्यामुळे अनेकांची फसवणूक व्हायची. मात्र जमिनीचा व्यवहार पारदर्शक व सुरळीत होण्यासाठी तसेच फसवणुकीच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी २०१२ पासून या विभागामार्फत खरेदी-विक्रीचे सर्वच व्यवहार आॅनलाईन करण्यात आले आहेत. दरवर्षी जमिनीच्या शासकीय मूल्यात १ जानेवारीपासून वाढ केली जाते, परंतु यावर्षी काही कारणास्तव शासनाने तीन महिने मुदतवाढ दिली होती. त्यामुळे आता १ एप्रिल २०१६ पासून जमिनीचे मूल्यांकन वाढणार आहे. खरेदी-विक्रीच्या व्यवहार करीत असताना सदर रकमेवर मुद्रांक शुल्क आकारला जातो. त्यावर शासनाला महसूल मिळते. पूर्वीपेक्षा १० ते १५ टक्क्यांनी शुल्कवाढ होणार असल्याने प्लॉटची खरेदी-विक्री करणाऱ्यांना मात्र दस्त नोंदणी करण्यासाठी अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. दुसरीकडे शासनाच्या तिजोरीत भर पडण्यास मदत होणार आहे. विविध कारणासाठी ज्यांच्या जमिनी शासनाने संपादित केल्या आहेत त्यांना या मूल्यवाढीचा चांगला लाभ होणार आहे. पारदर्शी व्यवहारासाठी दस्तनोंदणी आॅनलाईन केल्यामुळे मुद्रांक व नोंदणी फी ई-पेमेंटद्वारेही करता येत आहे. यामुळे नागरिकांच्या सोयीचे झाले असून घरबसल्याही नोंदणी फी भरता येते. तसेच कमी वेळेत दस्तनोंदणी पूर्ण होत आहे. सध्या महापालिका हद्दीत खरेदी खतावर ६ टक्के मुद्रांक शुल्क व १ टक्के नोंदणी फी आकारली जाते.तर महापालिकेच्या प्रभाव क्षेत्रात असलेल्या परिसरातील गावच्या जमिनीला ५ टक्के मुद्रांक शुल्क व १ टक्का नोंदणी फी आकारली जाते. याशिवाय जास्तीत जास्त नोंदणी फी ३० हजार रुपयापर्यंत लावली जाते. तर ग्रामीण भागातील जमिनीची खरेदी- विक्री केल्यास त्यावर ४ टक्के मुद्रांक शुल्क तर १ टक्के नोंदणी फी याप्रमाणे आकारली जाते. मात्र येत्या १ एप्रिलपासून मुद्रांक शुल्कामध्ये किमान १० ते कमाल १५ टक्के वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)