शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा ‘दरबार’ विनानिविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 00:53 IST

विभागीय आयुक्तालयातील सभागृहाचे सुशोभीकरण विनानिविदा सुरू असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : विभागीय आयुक्तालयातील सभागृहाचे सुशोभीकरण विनानिविदा सुरू असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. हे काम पूर्ण करून त्याचा खर्च डीपीसीच्या फंडातून घेण्यासाठी तजवीज केली जाणार असल्याचे वृत्त आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने मर्जीतील ठेकेदाराला हे काम देऊन त्याचे वेगवेगळ्या किरकोळ कामांमध्ये बिल अदा केले जाण्याची शक्यता आहे. जर निधीच मंजूर नाहीतर ते काम इमर्जन्सीमध्ये करण्याचा घाट कशासाठी घातला गेला, असा प्रश्न आहे. मंजुरी नसताना वाढीव कामे करून घेतल्यामुळे तीन अभियंत्यांचे निलंबन करण्यात आले आहे. विभागीय आयुक्तालयाचे सुशोभीकरण मंजुरी नसताना केले जात असल्याची चर्चा आहे.३ लाख रुपयांच्या पुढील सर्व कामे ई-टेंडरिंगने काढण्याचा शासनाचा आदेश असून, त्याचे उल्लंघन आयुक्तालयातील सभागृहाच्या सुशोभीकरणाच्या निमित्ताने झाले आहे. सुशोभीकरण करण्यासाठी एका मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यात आले आहे. ७० लाख रुपयांच्या आसपास त्या कामाचा खर्च आहे. २ लाख ९९ हजार रुपयांची २३ बिले मंजूर करून ते अदा करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. विभागीय आयुक्तालयाच्या सभागृहाच्या सुशोभीकरणासाठी अशी कोणती इमर्जन्सी होती. ज्यामुळे विनानिविदा काम करून घेण्यास सुरुवात झाली. मंत्रिमंडळ बैठकीची तारीख अजून निश्चित झालेली नाही. त्यामुळे सभागृहाच्या दुरुस्तीची एवढी गरज का भासली, असा प्रश्न आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहाच्या नूतनीकरणाची खरी गरज असताना विभागीय आयुक्तालयातील सभागृह चकचकीत केले जात आहे. विशेष म्हणजे हे करीत असताना तेथील फर्निचर आणि ध्वनियंत्रणेचा पूर्ण चुराडा केला जात आहे. ७ लाख रुपयांच्या आसपासची ही ध्वनियंत्रणा आहे. धुळीमुळे ती आता पूर्ण खराब होणार असून, त्यासाठीही विनानिविदा काम दिले जाऊशकते.