शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने त्यांच्या प्रकल्पांत स्थानिक उत्पादनच वापरावे

By admin | Updated: August 26, 2015 23:56 IST

जालना : विविध कारणांमुळे जालन्यातील स्टील उद्योग अडचणीत सापडला असून, या उद्योगापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

जालना : विविध कारणांमुळे जालन्यातील स्टील उद्योग अडचणीत सापडला असून, या उद्योगापुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सरकारच्या विविध प्रकल्पांसाठी गुणवत्तेचे राज्यातच उत्पादित केलेले स्टील वापरावे, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केल्याची माहिती उद्योजक तथा रुपम स्टीलचे किशोर अग्रवाल यांनी लोकमतशी बोलताना दिली.अन्य राज्यांतील वीजदराशी तुलना केली तर महाराष्ट्रात हे दर अधिक असल्याने उद्योगांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मध्यंतरी तात्कालीन राज्य सरकारने उद्योगांसाठी रात्रीच्या वेळी वीजदरात अडीच रुपयांची सूट दिली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी ती कमी करुन दीड रुपयांवर आणण्यात आली आहे. यासह विविध प्रकारच्या करांमुळे स्टील उद्योग सध्या अडचणीतून जात आहे. जालन्यातील बहुतांश स्टील कंपन्या बंद झाल्या असून, परिस्थिती अशीच राहिली तर अन्य कंपन्याही बंद होण्याची भीती अग्रवाल यांनी व्यक्त केली. राज्य सरकार एकीकडे ‘मेक इन महाराष्ट्र’चा नारा देत आहे. तर दुसरीकडे राज्यात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण नसल्याचे अग्रवाल म्हणाले. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही स्टील उद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या असून, त्या सोडविण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले उचलली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहे. मात्र, लवकरात लवकर पाऊले उचलली गेली नाही, तर स्टील उद्योगापुढे भीषण संकट निर्माण होण्याचे संकेत अग्रवाल यांनी यावेळी दिले. सध्या हा उद्योग अडचणीत सापडल्याने अनेक कारखाने तीन पाळ्यात चालविणे जिकीरीचे झाल्याने ते कमी पाळ्यावर सुरु आहेत. परिणामी जालन्यातील कारखान्यांपैकी अनेक कारखाने बंद झाल्याने हजारो लोक बेरोजगार झाले आहेत. सरकारने लवकरात लवकर यावर उपाययोजना आखण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे अग्रवाल यावेळी म्हणाले.