लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा होऊन अनेक वर्षे ेउलटली असली तरी हिंगोली जिल्ह्याचा हवा तसा विकास झाला नाही. व्यापार क्षेत्रातही प्रगती झाली नाही. त्यामुळे हिंगोली शहरात शासनाने व्यापारी संकुल उभारावे, शिवाय कारखान्याची उभारणी करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, अशी माहिती जिल्हा व्यापारी महासंघाचे संस्थापक तथा जिल्हाध्यक्ष रमेशचंद्र बगडिया तसेच महासंघाचे मार्गदर्शक धरमचंद बडेरा यांनी दिली.जिल्हा व्यापारी महासंघाची स्थापना के व्हा झाली?बगडिया - व्यापाऱ्यांच्या हितासाठी १९९१ साली जिल्हा व्यापारी महासंघाची स्थापना करण्यात आली. स्थापना झाल्यापासून आतापर्यंत व्यापाऱ्यांच्या हितासाठी महासंघातर्फे लढा दिला जात आहे. शिवाय शासनाकडे विविध मागण्यांसाठी पाठपुरावा सुरूच आहे.महासंघाच्या कोणकोणत्या मागण्या आहेत? बगडिया - ना रोजगार, ना उद्योग म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर शासनाने एखाद्या कारखान्याची उभारणी करावी. याबाबत व्यापारी महासंघातर्फे प्रशासनामार्फत वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आली. शिवाय अजूनही पाठपुरावा सुरूच आहे. शासनाने लागू केलेल्या जीएसटीबद्दल महासंघाचे काय मत आहे? बगडिया - शासनाने लागू केलेल्या जीएसटीला महासंघाचा विरोध नाही. परंतु जीएसटीमधील जाचक अटींमुळे लहान व्यापाऱ्यांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीएसटीमधील जाचक नियमात सुधारणा होणे गरजेचे आहे. जिल्हा बंदमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होते का?बडेरा - जिल्हा बंदचे आवाहन एखाद्या पक्ष किंवा संघटनेतर्फे करण्यात आल्यास संबधित पदाधिकारी महासंघाला कळवितात. किंवा तसे पत्रही देतात. शिवाय पोलीस प्रशासनही महासंघाचे म्हणणे ऐकून घेते. अशावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याबाबत महासंघातील प्रत्येक पदाधिकारी खबदारी घेतात. परंतु बंदमुळे छोट्या व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. जिल्ह्यात व्यापार क्षेत्रात प्रगती होत आहे का? बडेरा - जिल्हा निर्मिती होऊन अनेक वर्षे झाली आहेत. परंतु व्यापार क्षेत्रात हवी तसी प्रगती झाली नाही. त्यामुळे रेल्वे दळणवळण वाढीस लागल्यास निश्चित प्रगती होईल. जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज होणे तितकेच महत्त्वाचे आहे. शिवाय इतर सुविधा निर्माण झाल्यास व्यापाराला चालना मिळू शकते.
शासनाने हिंगोलीत व्यापारी संकुल उभारावे
By admin | Updated: July 4, 2017 23:41 IST