शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
2
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
3
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
4
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
6
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
7
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
8
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
9
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
10
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
11
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
12
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
13
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
14
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
15
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
16
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
17
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
18
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
19
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
20
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका

शासकीय ‘विश्रामा’त दारुचे पेग !

By admin | Updated: January 9, 2015 00:50 IST

उस्मानाबाद : शहरातील पोलीस मुख्यालयानजीक असलेल्या शासकीय विश्रामगृहा बरोबरच आवारातही देशी-विदेशी दारुच्या बाटल्या आढळून येत आहेत़

उस्मानाबाद : शहरातील पोलीस मुख्यालयानजीक असलेल्या शासकीय विश्रामगृहा बरोबरच आवारातही देशी-विदेशी दारुच्या बाटल्या आढळून येत आहेत़ त्यामुळे या शासकीय विश्रामगृहातच दारूचे पेग रिचवितो कोण? असा प्रश्न समोर येत आहे़ विशेष म्हणजे या विश्रामगृहात अनेकजण नाव नोंदणी नसतानाही आराम करीत असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधींनी गुरूवारी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून दिसून आले़ उस्मानाबाद प्रमाणेच जिल्ह्यातील इतर विश्रामगृहांचीही अवस्था असल्याचे केलेल्या पाहणीत दिसून आले. याचा फटका अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ‘व्हीआयपीं’ना सोसावा लागत असल्याचे चित्र आहे़विजय मुंडे ल्ल उस्मानाबादशासकीय विश्रामगृहात राजकीय पुढारी, अधिकाऱ्यांसह व्हीआयपींना ‘विश्राम’ करण्यासाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी शासकीय विश्रामगृहे बांधण्यात आली आहेत़ उस्मानाबाद शहरात शिंगोली नजीक, शहरात पोलीस मुख्यालयानजीक शासकीय विश्रामगृह आहे़ तसेच जलसंपदा विभाग, महावितरण कंपनी यांची वेगवेगळी विश्रामगृहे आहेत़ गुरूवारी शहरातील पोलीस मुख्यालयानजीकच्या विश्रामगृहाची पाहणी केली असता आवारात अस्वच्छता दिसून आली़ ठिकठिकाणी कचरा आणि पाण्याच्या बाटल्या दिसून येत होत्या़ या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्ये देशी-विदेशीच्या बाटल्या पडल्या होत्या़ आतमध्ये रूमची साफसफाई ठेवण्यात आली होती़ तसेच पहिल्या मजल्यावर एका कोपऱ्यात ‘विदेशी’चा खांबा आणि पाण्याची बाटली होती़ एकूणच शासकीय विश्रामगृहात बिनधास्तपणे देशी-विदेशी मद्याचे पेग रिचविण्याचा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे या बाटल्या इथे टाकणाऱ्यांचा शोध घेवून तात्काळ कारवाई करण्याची गरज व्यक्त होत आहे़मारूती कदम ल्ल उमरगापाटबंधारे प्रकल्प मजबुतीकरण विभागाच्या अख्त्यारित असलेल्या येथील शासकीय विश्रामगृहाच्या शेजारी असलेल्या दोन खोल्यांमध्ये चक्क दारूच्या, शितपेयांच्या बाटल्यांचा खच दिसून आला़ परिसरातील घाणीचे साम्राज्य आणि शौचालयाची दूरवस्था यामुळे विश्रामगृहालाच घरघर लागल्याचे दुर्दैवी चित्र गुरूवारी केलेल्या पाहणीतून दिसून आले़शहरातील दत्त मंदिर कॉलनी भागात वीस वर्षापूर्वी पाटबंधारे विभागाकडून येथे व्हीआयपींच्या निवासाची सोय व्हावी म्हणून विश्रामगृहाची उभारणी करण्यात आली आहे़ विश्रामगृहाच्या देखभाल दुरूस्तीकडे दूर्लक्ष करण्यात आल्याने सद्यस्थितीत अनेक समस्या येथे निर्माण झाल्या आहेत़ विश्रामगृहाच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ शेजारी असलेल्या स्वयंपाक गृहाचीही दूरवस्था झाली आहे़ येथील शैचालयाचा वापर अनेक वर्षापासून बंद असून, दरवाजे तुटून पडले आहेत़ या परिसरात मोकाट जनावरे, डुकरांचाही वावर वाढला आहे़ शेजारीच मुख्य अभियंत्यांचे निवासस्थान आहे़ या निवासस्थानासमोर अनेक वर्षापूर्वी एक कार उभा करण्यात आली आहे़ मात्र, तिचा वापर नसल्याने ती कार अनेक वर्षापासून धूळखात पडली आहे़ विश्रामगृहाच्या शेजारी असलेल्या दोन खोल्यांमध्ये काही इसमांनी दारू पिवून टाकलेल्या बाटल्या जमा करण्यात आल्या आहेत़ दारूच्या बाटल्यांची संख्या पाहता पाहणाराही अवाक होवू जातो ! विशेष म्हणजे हा प्रकार शासकीय विश्रामगृहातील मद्यपींचाच असल्याचेही दिसून येत आहे़मी नवीन आहेया विश्रामगृहाबाबत कार्यकारी अभियंता एस़आऱसोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी या कार्यालयाचा नव्याने पदभार घेतला आहे़ मला विश्रामगृहातील सुविधांबाबत माहिती नाही़ पाटबंधारे कार्यालय स्थलांतरित करण्याच्या हलचाली सुरू आहेत़ कार्यालयाचे स्थलांतर किंवा पुनर्वसन मार्च पर्यंत होण्याची शक्यता आहे़ विश्रामगृहातील सोयी-सुविधांची माहिती घेवून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असेही सोनवणे म्हणाले़सध्या पाटबंधारे प्रकल्प मजबुतीकरणाची कामे बंद आहेत़ त्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांचे या विश्रामगृहाकडे दूर्लक्ष झाले आहे़ येथील स्वच्छता, रखवालीसाठी कर्मचाऱ्याची नियुक्ती नसल्याने अधिकारीही दूुर्लक्ष करीत आहेत़ त्यामुळे कोणीही या, कसेही वावरा आणि निघून जा, अशीच स्थिती या विश्रामगृहाच्या बाबतीत असून, देखभालीअभावी विश्रामगृहाला घरघर लागली आहे़पांडुरंग पोळे ल्ल नळदुर्गदेखभाल दुरूस्ती अभावी नळदुर्ग (ता़तुळजापूर) येथील शासकीय विश्रामगृहाला उकिरड्याचे स्वरूप आले आहे़ ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, परिसरात दारूच्या बाटल्या दिसून येतात़ या प्रकारामुळे शासनाच्या उद्देशाला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे़शासकीय अधिकारी, उच्चपदस्त राजकीय नेत्यांसह विविध विभागातील व्हीआयपींना राहता यावे, विश्रांती मिळावी यासाठी ठिकठिकाणी शासकीय विश्रामगृहे बांधण्यात आलेली आहेत़ नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृहाच्या देखभालीसाठी एक शाखा अभियंता, एक लिपिक व दोन सेवक कार्यरत आहेत़ पाच सुटाच्या या विश्रामगृहाच्या आवारात मात्र मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ बागबगिचासाठी असलेल्या जागेत गवत उगवले असून, देशी-विदेशी दारूच्या बाटल्याही ठिकठिकाणी आढळून येतात़ तर गुटख्याच्या पुढ्यांचा ढिगाराही दिसून येतो़ अनेक सूटच्या काचा फुटल्या असून, बाथरूममध्येही स्वच्छतेअभावी दूर्गंधी सुटली आहे़ विजेअभावी परिसरात रात्री अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते़ त्यामुळे रात्री कोणाचा वावर असतो हेही कळू शकत नाही़ येथील रजिस्टरवर २६ डिसेंबर रोजीची शेवटची नोंद आहे़ नगर पालिकेकडून येथे पाण्याचा पुरवठा करण्यात येतो़ मुबलक जागा असतानाही बगिचा फुलविल्याचे दिसत नाही़ तर असलेली झाडे-झुडपेही कोमेजून जावू लागली आहेत.