शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कार्यालयांकडे कोटींची थकबाकी

By admin | Updated: March 20, 2017 22:41 IST

बीड बिल अदा करण्याची उदासीनता केवळ घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांमध्येच नाही तर शासकीय कार्यालयेही त्याच रांगेत आहेत.

राजेश खराडे  बीडबिल अदा करण्याची उदासीनता केवळ घरगुती, व्यापारी, औद्योगिक ग्राहकांमध्येच नाही तर शासकीय कार्यालयेही त्याच रांगेत आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका अंतर्गतच्या पाणीपुरवठा विभागाकडे महावितरणचे ५५ कोटी ६५ लाख एवढी थकबाकी आहे, तर न.प.च्या विद्युत विभागाकडे १९ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.सध्या बीड विभागात मार्च अखेरच्या अनुषंगाने विशेष वसुली मोहीम सुरू आहे. उपविभागीय कार्यालयातील अभियंते, वायरमन, स्थानिक पातळीवर घरगुती ग्राहकांकडे वसुली करीत आहेत, तर अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांना शासनदरबारी जाण्याची वेळ आली आहे.बीड विभागाकडे कृषी पंपासह १४२२ कोटींची थकबाकी असून, परिमंडळात थकबाकीत बीड अग्रस्थानी आहे. त्यामुळे विभागाला ९४ कोटींचे वसुलीचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. फेब्रुवारी अखेरीस २० कोटींची वसुली झाली असून, मार्चच्या सुरुवातीपासून दिवस उजाडताच अधिकारी, कर्मचारी ग्राहकांच्या दारी जात आहेत. वेळप्रसंगी ग्राहकांना नोटीस बजावली जात असून, अधिकच्या थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे.ग्राहकांपाठोपाठ आता महावितरणने वसुलीचा मोर्चा शासकीय कार्यालयाकडे वळविला आहे. पाणीपुरवठ्याकरिता विभागात उच्च विद्युत दाब वाहिनीवरील १४ ग्राहकांची नोंद असून, त्यांच्याकडे ५५ कोटींची थकबाकी आहे. वसुलीच्या अनुषंगाने अधीक्षक अभियंता रतन सोनुले व कार्यकारी अभियंता जी.बी. घोडके यांनी सोमवारी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांची भेट घेऊन वसुलीसंदर्भात आवाहन केले आहे.पाणीपुरवठ्याप्रमाणेच पथदिव्यांचीही थकबाकी दिवसेंदिवस वाढत आहे. बीड न.प.कडे २२ कोटींची थकबाकी असून, महिनाकाठी केवळ १२ ते १३ लाखांची बोळवण केली जात आहे. त्यामुळे ही रक्कम व्याजापोटीच जमा होत असल्याने मुद्दलामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. न.प. पाणीपुरवठा विभागाकडे १५ कोटींची थकबाकी आहेएकंदरित सर्वच शासकीय कार्यालयांकडे कोटींच्या घरात थकबाकी असून, वसुलीबाबत उदासीनता असल्याने वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच पत्रही बीड विभागाकडे सुपुर्द झाले असून, त्वरित बिले अदा न केल्यास पाणीपुरवठा करणाऱ्या चौदाही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. परिणामी याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांनाच सोसावा लागणार आहे.