शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालये बनली ‘मैदान-ए-जंग़़़’

By admin | Updated: July 16, 2014 01:25 IST

लातूर : मंगळवार हा एका अर्थाने जिल्ह्यासाठी आंदोलनवारच ठरला़ जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका आंदोलनकर्त्यांनी गजबजली होती़

लातूर : मंगळवार हा एका अर्थाने जिल्ह्यासाठी आंदोलनवारच ठरला़ जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, महानगरपालिका, नगरपालिका आंदोलनकर्त्यांनी गजबजली होती़ धनगर समाजाने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी लातुरात मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही काळ ठिय्या दिला़ तर लिंगायत समाजाने आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी जिल्हाभरातील तहसील कार्यालयांसमोर धरणे आंदोलन केले़ त्यातच लातूरच्या मनपा कर्मचाऱ्यांनी वेतनासाठी लेखणी बंद आंदोलन केले़ औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर पालिकांतील कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे़ दरम्यान, लातुरातील शिवसेनेने नागरी समस्यांसंदर्भात आयुक्तांना घेराव घातला़महानगरपालिका ठप्पआपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले़ त्यामुळे पालिकेतील कामे दिवसभर ठप्प झाली होती़राज्यातील नगरपालिका व ड वर्ग महानगरपालिकेचे कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत़ त्यांच्या आंदोलनास पाठिंबा देताना लातूर मनपाच्या कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय धरणे आंदोलन केले़मनपात वेळेवर वेतन मिळत नाही़ गेल्या ६-७ महिन्यांपासून त्यांचे वेतन थकले आहे़ त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे़ परिणामी कर्मचारी सावकारी पाशात जखडले जात असल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे़ शासनाने मनपा स्थापनेपासून पुढील ५ वर्षांपर्यंत सहाय्यक अनुदान मंजूर करावे, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी मांडली आहे़ दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनास शिवसेनेने पाठिंबा दर्शविला़ हक्कासाठी धनगर समाज एकवटलाधनगर समाज अनुसूचित जमातीत समाविष्ट असून राज्य सरकारने त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी, ही प्रमुख मागणी घेऊन मंगळवारी धनगर समाज बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़धनगर समाज अनुसूचित जमातीच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर नमूद आहे, त्याची राज्य सरकारने अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी धनगर समाजाच्या वतीने वेगवेगळी आंदोलने करण्यात आली़ परंतु, प्रत्येकवेळी शासनाने केवळ आश्वासनच दिले़ त्याची पूर्तता कधी केली नाही़ माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही शब्द पाळला नाही़ त्यामुळे हे शासन धनगर समाज विरोधी आहे का, असा सवाल आंदोलनप्रसंगी उपस्थित करण्यात आला़ आता मात्र मागण्यांच्या मंजुरीशिवाय माघार न घेण्याचा निर्धार करण्यात आला़ आंदोलनात धनगर समाज महासंघ, मल्हार सेना, महिला संघटना, कर्मचारी धनगर संघटना, विद्यार्थी आघाडीचे पदाधिकारी, अ‍ॅड़निवृत्तीराव करडे, संभाजीराव बैैकरे, नागनाथ गाडेकर, बालाजी बैैकरे, प्रा़दिलीप चौधरी, अ‍ॅड़जीवन करडे, प्रा़अशोक अभंगे, रामराव रोडे, छायाताई देवकते, अ‍ॅड़दिगंबर साके, बालाजी वाघमारे, अ‍ॅड़मनोज लांडगे, दयानंद सुरवसे, अशोक भंडे, सुजीत वाघे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते़मुंबई येथील धरणे आदोंलनात आघाडी सरकारने आरक्षणाबाबत दिलेला शब्द पाळला नसल्याने समाजबांधवाच्या भावना तीव्र झाल्याची प्रतिक्रिया आंदोलनस्थळी उमटल्या़ ‘त्या’ बदलीचा निषेधजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात धनगर समाजाने लिंगायत समाजास ओबीसीच्या सवलती लागू कराव्यात, अशीही मागणी मांडली आहे़ शिवाय, वरिष्ठ अधिकारी सुभाष माने यांची बदली जातीच्या आकसातूनच करण्यात आल्याचा आरोप करुन आंदोलनकर्त्यांनी निषेधही नोंदविला़ लिंगायत समाजाचे ‘अल्टीमेटम’लिंगायतसह सर्व पोटजातींना त्यांच्या प्रवर्गानुसार लिंगायत नावासह आरक्षण देण्याबाबत आघाडी सरकारने दिलेला शब्द न पाळल्याने मंगळवारी राज्यभरातील तहसील कार्यालयासमोर समाज बांधवांनी धरणे आंदोलन केले़ आठवडाभरात मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरात जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला़लिंगायत संघर्ष समिती लातूरच्या वतीने मंगळवारी तहसील कार्यालयासमोर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी मुर्गाप्पा खुमसे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आदोंलन करण्यात आले़ लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा मिळावा, राज्य शासनाने लिंगायत धर्म मान्यतेची केंद्र सरकारकडे शिफारस करावी, लातूरच्या विमानतळास जगद्ज्योती श्री महात्मा बसवेश्र्वर नाव द्यावे, मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्र्वरांचे स्मारक निर्माण करावे, मन्मथ स्वामी कपिलधार क्षेत्राचा विकास करावा आदी मागण्यांचा समावेश आहे़ श्री महात्मा बसवेश्वरांसह अन्य महापुरूषांच्या प्रतिमेस श्रीशिवानंद शिवाचार्य महाराज, तमलूरकर यांनी पुष्पहार अर्पण केले़ आंदोलनास काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसेसह विविध पक्ष व संघटनांनी पाठिंंबा दर्शविला़ तहसीलदार महेश शेवाळे यांनी निवेदन स्वीकारले़ यावेळी महापौर स्मिता खानापूरे, ललिताताई पांढरे, बाबासाहेब कोरे, विजयकुमार शेटे, शिवराज खुब्बा, राजेश विभूते, इराण्णा पावले, उमाकांत पंचाक्षरी, सतीश खेकडे, रामलिंगअप्पा ठेसे, पुष्कराज खुब्बा, सागर मांडे आदी समाजबांधव उपस्थित होत़े़