शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

घाटी रुग्णालयात औषधी टंचाई कायम; वैद्यकीय शिक्षण संचालकांना आश्वासनाचा विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 13:06 IST

घाटी रुग्णालयासह राज्यभरात १ सप्टेंबरपर्यंत १४३ आजारांसाठीच्या औषधींचा साठा दाखल होईल, असा दावा वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी केला होता

ठळक मुद्देबाह्यरुग्ण (ओपीडी) विभागात दररोज १,७०० ते २,००० रुग्णांवर उपचार होतात. घाटीत गेल्या वर्षभरापासून औषधांची टंचाई आहे. 

औरंगाबाद : घाटी रुग्णालयासह राज्यभरात १ सप्टेंबरपर्यंत १४३ आजारांसाठीच्या औषधींचा साठा दाखल होईल, असा दावा वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी केला होता; परंतु घाटीत हा साठा अद्याप आलेला नाही. त्यामुळे रुग्णालयातील औषध टंंचाई कायम असल्याने गोरगरीब रुग्णांचे हाल सुरूच आहेत.

न्यायालयीन प्रकरणानिमित्त डॉ. शिनगारे शहरात आले असताना त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला होता. त्यावेळी १ सप्टेंबरपर्यंत औषधींचा पुरवठा होणार असल्याचे ते म्हणाले होते. घाटी रुग्णालयात सोमवारी माहिती घेतली असता अद्याप औषधी प्राप्त झालेली नसल्याची माहिती समोर आली. घाटीत दररोज मराठवाड्यासह विदर्भ आणि लगतच्या भागातून शेकडो रुग्ण उपचारासाठी येतात.यामध्ये एकट्या बाह्यरुग्ण (ओपीडी) विभागात दररोज १,७०० ते २,००० रुग्णांवर उपचार होतात. यातील अनेकांना आंतररुग्ण विभागात दाखल केले जाते. घाटीत गेल्या वर्षभरापासून औषधांची टंचाई आहे. 

प्रतिजैविके, अ‍ॅन्टिरेबीज व्हॅक्सिन, मेट फारमिन, आयसो सरबाईट, अशा मधुमेह, उच्च रक्तदाबासह महत्त्वाच्या औषधींच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यातही गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, गोरगरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करून औषधींची खरेदी करावी लागत आहे.

औषधी खरेदी घोटाळ्यांना पायबंद घालण्यासोबतच तिच्या खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्याची जबाबदारी ‘हाफकिन’ कंपनीवर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ‘हाफकिन’कडूनच औषधी खरेदी होणार आहे; परंतु गेल्या काही महिन्यांपासून घाटी रुग्णालयास औषधी उपलब्ध होण्याची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण असा दोन्ही विभागांची एकत्र औषधी खरेदी ‘हाफकिन’ला अवघड होते. त्यामुळे त्यांनी दर तीन महिन्यांचा एक अशा चार टप्प्यांत याद्या,अशी सूचना केली. त्यामुळे नव्याने प्रक्रिया करण्यात आणखी उशीर झाला. या सगळ्या प्रक्रियांच्या गोंधळात घाटी रुग्णालयात औषधींची नुसती प्रतीक्षाच करावी लागत आहे. त्याचा भुर्दंड रुग्णांना सहन करावा लागत आहे.  

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीmedicineऔषधंState Governmentराज्य सरकार