शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या हिताबद्दल शासन उदासीन

By admin | Updated: July 14, 2017 00:10 IST

हिंगोली : डॉक्टर संरक्षण कायदा अधिक कडक करून कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : डॉक्टर संरक्षण कायदा अधिक कडक करून कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. डॉक्टरांवरील होणारे हल्ले ही गंभीर बाब असून दोषींवर कारवाई होणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष डॉ. जयदीप देशमुख, जिल्हासचिव डॉ. स्नेहल नगरे, कोषाध्यक्ष डॉ. विठ्ठल करपे यांनी सांगितले. इमाची स्थापना केव्हा झाली?डॉ. देशमुख - डॉक्टरांच्या हितासाठी तसेच रूग्णांच्या सेवेसाठी १९२८ साली राष्ट्रीय स्तरावर इंडियन मेडिकल असोसिएशनची स्थापना ्राली. हिंगोली जिल्ह्यात मागील तीस वर्षांपासून असोसिएशन कार्यरत आहे.संघटनेच्या राज्य स्तरावरील मागण्या कोणत्या? डॉ. देशमुख - डॉक्टर संरक्षण कायदा अधिक कडक करावा. हा कायदा तर झाला. मात्र तो कुचकामी आहे. शिवाय क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अ‍ॅक्ट रद्द झाला पाहिजे, यासाठी राज्य स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. या कायद्यामुळे रूग्णसेवा महागडी होईल व सामाजिक बांधिलकी लोप होणार आहे. बड्या व्यावसायिक कंपन्या किंवा त्या पद्धतीची कॉर्पोरेट रुग्णालयेच या कायद्याच्या कसोटीवर टिकतील. इतरांना ते बांधकामासह इतर सर्वच नियम पूर्ण करणेज शक्य नाही. त्यामुळे या कायद्यात आवश्यक सुधारणा करणे गरजेचे आहे. जेणेकरून रूग्णसेवा व डॉक्टरांचे हित जोपासले जाईल. कायद्यानंतर हल्ले थांबले? डॉ. देशमुख - डॉक्टरांना मारहाण करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. अशावेळी असोसिएशन डॉक्टरांना संरक्षण देण्यासाठी झगडते. शिवाय संबधित रूग्णास विश्वासात घेऊन दोषींवर कारवाईसाठी पोलिसांत तक्रार दिली जाते. त्यामुळे डॉक्टर संरक्षण कायदा अधिक कडक झाला पाहिजे. डॉक्टरांना मारहाणीच्या घटनेत वाढ का होत आहे?डॉ. करपे - बऱ्याचदा रूग्णाचे नातेवाईक डॉक्टरांसोबत किरकोळ कारणावरून वाद घालतात. शिवाय इतर मध्यस्थी करणारे विनाकारण भांडण वाढवितात. परिणामी मारहाणीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे उपचार घेताना रूग्ण व त्याच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना विश्वासात घेणे तितकेच गरजेचे आहे.असोसिएशनच्या मागण्यांवर शासन सकारात्मक आहे का? डॉ. नगरे - शासनाकडून डॉक्टरांच्या हिताबद्दल योग्य निर्णय घेतले जात नाहीत. परंतु जाचक अटी व नव-नवीन कायदे मात्र केले जात आहेत. कट प्रॅक्टिससंदर्भातील कायदाही त्याचेच द्योतक आहे. ग्रामीण रुग्णांना आजारासंदर्भात काहीच कळत नाही. त्यांनी विचारले तरीही कोणत्या प्रकारच्या तज्ज्ञाच्या रुग्णालयात जायचे हे सांगितल्यास तो गुन्हा ठरणार आहे. त्यामुळे रूग्ण्सेवा देताना डॉक्टरांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. जैविक कचऱ्याबद्दल उपाय होतात का? डॉ. करपे - जैविक कचरा नेण्याचा जालना येथील एका संस्थेशी करार झाला. मात्र घन कचऱ्याच्या विल्हेवाटसाठी पालिकेने कचराकुंड्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे.संघटनेचा आगामी अजेंडा?डॉ. नगरे- क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट कायद्यात सुधारणा करावी, यासाठी देशपातळीवर असोसिएशनतर्फे प्रामुख्याने प्रयत्न केले जात आहेत. हाच अजेंडा आहे.