शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दोन आठवड्यांत शासकीय समित्यांचे गठन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:04 IST

औरंगाबाद : येत्या दोन आठवड्यांत शासकीय समित्यांचे गठन होईल. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हा घटक पक्ष आहे. त्यामुळे २५ ...

औरंगाबाद : येत्या दोन आठवड्यांत शासकीय समित्यांचे गठन होईल. महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस हा घटक पक्ष आहे. त्यामुळे २५ ते ३० टक्के जागांवर समाधान मानावे लागेल आणि त्यावर चांगल्या कार्यकर्त्यांची वर्णी लावावी लागेल, असे रविवारी येथे राज्याचे आरोग्यमंत्री व औरंगाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले.

ते संपर्क मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी भवनात आले होते. आढावा बैठक असे स्वरूप होते; परंतु बघता बघता या बैठकीचे स्वरूप मेळाव्यात झाले. सुरुवातीला मंचावर मोठी गर्दी झाली. राजेश टोपे यांना निवेदने देण्यासाठी झुंबड उडाली. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी टोपे यांच्यासोबत फोटो काढण्याची जणू स्पर्धाच केली.

राजेश टोपे यांचा आज वाढदिवस होता, तसेच संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच राष्ट्रवादी भवनात आले होते. त्यामुळे जो तो त्यांच्या सत्कारासाठी पुढे सरसावत होता; परंतु भंडारा येथे जी निष्पाप बालके जळून दगावली, त्या पार्श्वभूमीवर राजेश टोपे कुठलाही सत्कार घेणार नाही, असे जाहीर करून दगावलेल्या त्या बालकांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ज्योती अभंग, आशा निकाळजे, विजया बनकर, राहुल सोनवणे, गुड्डू निकाळजे आदी माजी नगरसेवकांना टोपे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. नंतर पत्रकारांशी बोलताना टोपे यांनी, शहराच्या नामांतरापेक्षाही इतर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, असे सांगत याबाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी कोणतीही भूमिका नाही. वादग्रस्त प्रश्नांचा निर्णय घेण्यासाठी तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची मिळून कोअर कमिटी बनली आहे. ही कमिटी औरंगाबाद शहराच्या नामांतराबद्दल जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य राहील, असे स्पष्ट केले.

प्रारंभी, जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील यांनी प्रास्ताविक केले. कदीर मौलाना, दत्ता भांगे, जयमलसिंग रंधवा, अमोल दांडगे, महेश उबाळे, सूरजितसिंग खुंगर, बादशहा पटेल, जफर बिल्डर, सय्यद मतीन, कैसर कुरेशी, भाऊसाहेब तरमळे, शहराध्यक्ष विजय साळवे, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख आदींनी मनोगत व्यक्त केले. मंचावर द्वारकाभाऊ पाथ्रीकर, रंगनाथ काळे, भाऊसाहेब चिकटगावकर, मुश्ताक अहमद, छाया जंगले पाटील, मेहराज पटेल, वीणा खरे, सुधाकर सोनवणे आदींची उपस्थिती होती.