शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धान्यमाफियांना प्रशासनाचे आशिर्वाद

By admin | Updated: August 10, 2014 00:10 IST

विजय चोरडिया जिंतूर येथील शासकीय गोदामातून धान्य तस्करी करणारे रॅकेट मागील अनेक दिवसांपासूून कार्यरत आहे.

विजय चोरडिया जिंतूरयेथील शासकीय गोदामातून धान्य तस्करी करणारे रॅकेट मागील अनेक दिवसांपासूून कार्यरत आहे. पुरवठा विभागासह पोलिस प्रशासनाचेही या रॅकेटला उघड सहकार्य असल्याचे बोलल्या जाते. गोरगरिब जनतेच्या तोंडचा घास पळविणाऱ्या या दलालांच्या मुसक्या आवळण्याची हिंमत प्रशानसामध्ये नाही. येथील शासकीय गोदाम नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. वेगवेगळ्या योजनेचे धान्य गोदामात साठविल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी दलालांची टोळी कार्यरत असते. विशेष म्हणजे अन्न सुरक्षा योजनेंंतर्गत हजारो क्विंटल धान्य जिंतूरात येते. हे धान्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याऐवजी स्वस्तधान्य दुकानदारांना हाताशी धरून व प्रशासनाच्या सहकार्याने रॅकेट चालविणारे दलाल या धान्याची विल्हेवाट लावतात. दर महिन्याला ५ हजार क्विंटल गहू व तांदूळ गोदामात येतो. यापैकी ५० टक्के धान्यही शेवटच्या घटकापर्यंत पोहचत नाही. काही रेशन दुकानदार तर मिळालेल्या धान्यापैकी २५ ते ३० टक्के धान्य गावात नेतात. उर्वरित धान्य दलालांच्या खिशात जाते. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी पाठपुरावा केला. जिल्हा प्रशासनाने नेहमीच सोयीची भूमिका घेत दलालांना पाठिशी घालण्याचे काम केले. शिल्लक कोठ्याबरोबरच अन्न सुरक्षा योजनेंतर्गत येत असलेल्या हजारो क्विंटल धान्यातही मोठा काळा बाजार आहे. याकरीता मोठे रॅकेट कार्यरत असून संबंधित रॅकेटकडून जिल्हा पुरवठा विभाग, तालुका पुरवठा विभाग, पोलिस यंत्रणा यांना ठरविक पॅकेज मिळत असल्याने संंबंधित दलालांवर कठोर कारवाई करण्याबाबत या विभागाकडून फारशी उत्सुकता दाखविली जात नाही. म्हणूनच की काय? जिंतूर गोदाम हे दलालांचा अड्डा बनला आहे. अंत्योदय योजना, दारिद्रय रेषेखालील कार्डधारक, अन्न सुरक्षा योजना यामध्ये असलेल्या लाभार्थ्यांना वर्षातील बारा महिन्याचे धान्य उचलून सहा महिन्याचे धान्यच वाटण्यात येते. या संदर्भात लाभार्थ्यांनी तक्रार केल्यास त्यास दमदाटी करून धान्य बंद करण्याची धमकी संबंधित दुकानदाराकडून देण्यात येते. सहा महिन्याचा धान्य कोटा काळ्या बाजारात नेऊन लाखो रुपयांचा धान्य घोटाळा जिंतुरात सध्या सुरू आहे.