शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

भीषण आगीत दुकान खाक

By admin | Updated: May 23, 2014 01:05 IST

औरंगाबाद : औरंगपुर्‍यातील नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला गुरुवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीने अल्पावधीत रौद्ररूप धारण केले.

औरंगाबाद : औरंगपुर्‍यातील नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला गुरुवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीने अल्पावधीत रौद्ररूप धारण केले. बघता बघता दुकानाच्या तिन्ही मजल्यावरील टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदी साहित्य जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार कोट्यवधी रुपयांचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जळून खाक झाल्याची माहिती दुकानाच्या एका वरिष्ठ कर्मचार्‍याने दिली. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. औरंगपुरा येथे अंबा थिएटर व बलवंत वाचनालय यांच्या मध्ये नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स हे ३० वर्षांचे टीव्ही, फ्रीज विक्री करणारे दुकान आहे. नुकतेच या दुकानाचे नूतनीकरण करून १ मे रोजी समारंभपूर्वक उद्घाटनही झाले होते. हे दुकान नूतनीकरणानंतर गोदरेज कंपनीचे एक्सक्लुझिव्ह शोरूम म्हणून सुरू झाले होते. एलसीडी, एलईडी, फ्रीज, वॉशिंग मशीन, मायक्रो ओव्हन, एसी आदी इलेक्ट्रॉनिक्स साहित्याने हे दुकान खच्चून भरले होते. आग लागण्यापूर्वी अर्धा तास अगोदर ट्रकभर माल दुकानाच्या तळमजल्यातील गोदामात उतरविला होता. साधारण १.४५ वाजेच्या सुमारास या दुकानाच्या तळमजल्यातील गोदामात आग लागली. सुरुवातीला दुकानाच्या बाहेर बाजूला असलेल्या कागदाला आग लागली असावी, असा अंदाज दुकान मालक व कर्मचार्‍यांनी काढला. काही वेळात मात्र आपल्याच दुकानात आग लागल्याचा त्यांना अंदाज आला. सावधगिरी बाळगून दुकानातील १२ ते १४ कर्मचार्‍यांनी दुकानाबाहेर पळ काढला. तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष व अग्निशामक दलाला या घटनेची माहिती कळविली. काही वेळातच अग्निशामक दलाचे ३ बंब व ९ टँकर घटनास्थळी दाखल झाले. तब्बल ६ तास अथक परिश्रम घेऊन अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला; पण आग भडकतच राहिली. दुकानातील फ्रीज व एसीच्या कॉम्प्रेसरचे स्फोट होऊन आगीने रौद्ररूप धारण केले. औरंगपुर्‍यातील नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोरचे पत्र्याचे शेड सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास बुलडोझरच्या साह्याने पाडले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी बंब दुकानाच्या दरवाजाजवळ नेला व आग विझविण्याचा प्रयत्न केला. दुकानाच्या भिंतींना भगदाड पाडून अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा केला, तरीही आग आटोक्यात येण्याचे नाव घेत नव्हती. आगीचे दृश्य एवढे भीषण होते की, हवेत वरपर्यंत धूर व आगीचे लोळ दिसत होते. नागरिकांनी मोठी गर्दी करून मोबाईलवर आगीचे शूटिंग, तर काहींची फोटो काढण्याची चढाओढ लागली होती. जमलेल्या बघ्यांच्या गर्दीमुळे अग्निशामक दलाच्या जवानांना सतत व्यत्यय येत होता. पोलिसांनी गर्दी पांगविण्याचा प्रयत्न केला. आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र, उशिरापर्यंत समजू शकले नाही. मात्र, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज काही जणांनी व्यक्त केला. यावेळी दुकान मालक लक्ष्मण होतचंद सावनानी, आ. प्रदीप जैस्वाल, माजी आ. किशनचंद तनवाणी, नगरसेवक अनिल मकरिये, गोपाल कुलकर्णी, व्यापारी महासंघाचे अजय शहा, मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, शिवाजी झनझन यांच्यासोबत अग्निशामक दलाचे २४ कर्मचारी उपस्थित होते. उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरूच होते. आगीचे लोळ आगीचे लोळ दिवाण देवडीपासून दिसत होते. धुराने परिसर झाकोळून गेला होता. आग पोहोचली व्हॉटस्अपवर आग बघणार्‍या बहुतांश युवकांनी स्मार्ट मोबाईलवर या आगीचे फोटो टिपले. आगीचे शूटिंग करण्यात तरुणीही मागे नव्हत्या. त्यांनी काढलेले फोटो व्हॉटस्अपवर शेअरही केले. काही क्षणांत सर्वत्र या आगीची बातमी पोहोचली व बघ्यांची गर्दी वाढतच गेली. सायंकाळपर्यंत ती घटली नव्हती. आग बघण्यासाठी जमलेल्या प्रचंड गर्दीला हटविण्यासाठी पोलिसांना ताकद वापरावी लागली. उत्साही युवक आगीने वेढलेल्या दुकानाजवळ जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना हटविण्यात पोलिसांची दमछाक झाली. अग्निशामक दलाची गाडी व पाण्याचे टँकर दुकानाजवळ येण्यास वेळ लागत होता. गर्दी हटवून या वाहनांना जाण्याचा मार्ग करून द्यावा लागला.आग बघण्यासाठी नागरिक, जिल्हा परिषदेचे बहुतांश अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने जमले होते. चारही बाजूंनी लोक तेथे येत होते.अक्षयतृतीयेच्या दिवशी या दुकानाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन झाले होते. डोळ्यादेखत दुकान आगीत जळताना पाहून येथील कर्मचार्‍यांना अश्रू आवरता आले नाही. त्यांना पाहून बघ्यांचेही डोळे पाणावले.