अंबड : गोर सिकवाडी प्रणित गोरसेना या सामाजिक संघटनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने तालुक्यातील गोरबंजारा स्त्री-पुरुष समाज बांधव सहभागी झाले होते.याप्रसंगी तहसीलदार यांना गोर सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये बंजारा समाज हा मुळात आदिवासी जमात असून या समाजाचा एस. टी. प्रवर्गात समावेश करावा, त्याचप्रमाणे गोरबोली या त्यांच्या भाषेला राज्य भाषेचा दर्जा देण्यात यावा, प्रत्येक तांड्यावर पायाभूत सुविधा देण्यात याव्या, नॉन क्रिमिलेयरची अट ताबडतोब रद्द करण्यात यावी, ऊसतोड कामगारांच्या पाल्यासाठी विशेष योजना राबविण्यात यावी, वसंतराव नाईक मंडळाला निधी उपलब्ध करण्यात यावा, तालुका स्तरावर गोरबंजारा समाजातील मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करण्यात यावे, वसंतराव नाईक तांडा व वस्तीसुधार योजना समिती जालना जिल्हाध्यक्षपद ताबडतोब भरण्यात यावे, कोंबडवाडी ता. अंबड व उज्जैनपुरी तांडा ता. बदनापूर येथे अद्यापही प्राथमिक शाळा नाही याठिकाणी शाळा सुरु करण्यात यावी, इ. मागण्यांसाठी वसंतराव नाईक चौक ते तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शेकडो समाज बांधव उपस्थित होते.या मोर्चात मार्गदर्शक म्हणून काशिनाथ नायक, प्रल्हाद जाधव, प्रवीण पवार, कल्याण राठोड, डॉ. रमेश राठोड आदी सहभागी झाले होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी नामदेव पवार, जयसिंग राठोड, बबन चव्हाण, एकनाथ चव्हाण, आबासाहेब राठोड, रवी राठोड, रमेश पवार, किसन राठोड, मुकेश जाधव, प्रेमदास राठोड, प्रकाश पवार, कैलास राठोड, कृष्णा राठोड, बबन राठोड, आकाश पवार, रवी राठोड, विजय जाधव, दिपक राठोड, अनिल राठोड यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
गोर बंजारा समाजाचा धडक मोर्चा
By admin | Updated: August 13, 2014 00:50 IST