शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोपीनाथगडावर कार्यक्रम; मुख्यमंत्री, रेल्वेमंत्री येणार

By admin | Updated: June 3, 2017 00:37 IST

परळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ३ जून रोजी गोपीनाथगडावर होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरळी : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ३ जून रोजी गोपीनाथगडावर होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे दोघेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. गोपीनाथगडावर १५० बाय २५० फूट आकाराचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून खासदार, आमदार, भाजपचे पदाधिकारी, अनेक कार्यकर्ते गडावर दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन तशी व्यवस्था आली आहे. आसनव्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पार्किंग, महाप्रसाद इ.चे नियोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी १० वाजता ह.भ.प. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन आणि त्यानंतर दुपारी १२.३० मुख्य कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. त्यानंतर महाप्रसाद होईल. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे, खा.प्रीतम मुंडे, अ‍ॅड.यशश्री मुंडे यांनी केले आहे.गोपीनाथगडावर अपंगांना स्वयंचलित स्कूटर, व्हील चेअर, सायकल, कर्णबधिरांना श्रवणयंत्र, अल्प दृष्टींना मोबाईल कीटचे वाटप करण्यात येणार आहे. जीवनज्योती योजनेंतर्गत महिला बचत गटांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. तसेच घरगुती गॅसचे वाटप केले जाईल. ऊसतोड कामगारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्य वाटप होणार आहे. इतरही विविध कार्यक्रम येथे पार पडणार आहेत.