परळी : लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या गोपीनाथ गडाचा लोकार्पण सोहळा १२ डिसेंबर रोजी होणार असून या सोहळ्यास दिग्गजांची हजेरी राहणार आहे. त्यानुषंगाने तयारी अंतिम टप्प्यात आहे. पांगरी व परळीत भव्य कमानी उभारण्यात आल्या असून, १००० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी येणार आहेत. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक, बीडचे जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्यासह ८ अतिरिक्त जिल्हा पोलिस अधिक्षक, २७ उपविभागीय पोलिस अधिकारी, १०३ पोलिस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, ७०० पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. वैद्यनाथ कारखान्याच्या परिसरात हेलीकॅप्टर उतरण्यासाठी ३ हेलीपॅडची तर शक्तिकुंज वसाहतील २ हेलीपॅडची सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी मान्यवर हेलीकॅप्टरने येणार आहेत. या अंतरराष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण १२ डिसेंबर रोजी होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. अध्यक्षस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा राहणार आहेत. भगवान गडाचे मठाधिपती डॉ.नामदेव शास्त्री व अन्य मान्यवरही हजेरी लावणार आहेत.या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरणही चालू आहे. स्वागत कमानी लावण्यात येत आहेत. तसेच परळी शहरात ठिकठिकाणी मान्यवरांच्या स्वागताच्या कमानी लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.दरम्यान, पालकमंत्री पंकजा मुंडे, खा. डॉ. प्रीतम मुंडे, यशश्री मुंडे या भगिनींच्या देखरेखीखाली कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. (वार्ताहर)परळी-बीड राज्य रस्त्यावरील पांगरी परिसरात १८ एक्कर च्या जागेत गोपीनाथ गड उभारण्यात आला आहे. यामध्ये लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांचे समाधी स्थळ, पुर्णाकृती पुतळा, थिम पार्क, विद्यार्थ्यांसाठी एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी. प्रशिक्षण केंद्र असणार आहे.४गोपीनाथ गडावर आकर्षक प्रवेशद्वार करण्यात आले आहे. भव्य पुर्णाकृती पुतळा व कमळ फुलाच्या आकाराचे ध्यान मंदिर बांधण्यात आले आहे.
१८ एक्कर जागेत साकारला गोपीनाथगड
By admin | Updated: December 9, 2015 23:55 IST