शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गुडईअर, इंडो जर्मन टूल रूम, ए.आय.टी.जी. संघ विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:19 IST

एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुडईअरने बांधकाम विभाग ब संघावर, इंडो जर्मन टूल रूमने एमआयटीवर, तर ए.आय.टी.जी.ने एशियनवर मात केली. आज झालेल्या सामन्यात इंद्रजित उढाण, मधुकर इंगोले व हुसेन अमोदी हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.

औरंगाबाद : एमजीएम मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत गुडईअरने बांधकाम विभाग ब संघावर, इंडो जर्मन टूल रूमने एमआयटीवर, तर ए.आय.टी.जी.ने एशियनवर मात केली. आज झालेल्या सामन्यात इंद्रजित उढाण, मधुकर इंगोले व हुसेन अमोदी हे सामनावीर किताबाचे मानकरी ठरले.पहिल्या सामन्यात ए.आय.टी.जी.ने ५ बाद १५७ धावा केल्या. त्यांच्याकडून मयंक विजयवर्गीयने ४८, दशवीरसिंह व संकेत पाटील यांनी प्रत्येकी २६ धावा केल्या. दीपक भुजंगे, इरफान पठाण, आशिष लाव्हे व हर्षवर्धन त्रिभुवन यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात एशियन हॉस्पिटल संघ ६५ धावांत गारद झाला. ए.आय.टी.जी.कडून मधुकर इंगोलेने १६ धावांत ६ व संकेत पाटीलने २ गडी बाद केले.दुसऱ्या सामन्यात बांधकाम विभाग ब ने ७ बाद १३७ धावा फटकावल्या. त्यांच्याकडून अबुबकर पटेलने ३१, युसूफ शेखने ३१ व सय्यद नूर उल हकने २१ धावा केल्या. गुडईअरकडून सिराज बेग, गणेश बोटे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. इंद्रजित उढाण, सुनील जाधव व राहुल पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरात गुडईअरने विजयी लक्ष्य १६ षटकांत २ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून इंद्रजित उढाणने ५५ चेंडूंतच ६ षटकार व ७ चौकारांसह ८९ धावा केल्या. बांधकाम विभाग ब संघाकडून राहुल परदेशीने १ गडी बाद केला.तिसऱ्या सामन्यात इंडो जर्मन टूल रूमने ८ बाद १३४ धावा केल्या. त्यांच्याकडून हुसेन अमोदीने ७ चौकारांसह ४३, दीपक जगतापने २ षटकार व २ चौकारांसह नाबाद ४० धावा केल्या.एमआयटी हॉस्पिटलकडून सारंग कांबळेने २६ धावांत ३ गडी बाद केले. प्रत्युत्तरात एमआयटी हॉस्पिटल संघ १२३ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून रोहन शहाने ३१ व साई डहाळे याने २० धावा केल्या. इंडो जर्मन टूल रूमकडून हुसेन अमोदी, महेश वझे यांनी प्रत्येकी २, तर सौरभ अडलक याने १ गडी बाद केला.