गेल्या महिन्यात सीसीआयकडून होत असलेली कापूस खरेदी आता बंद झाली असून त्यामुळे मोंढ्यातील दैनंदिन उलाढालीवर देखील परिणाम झाला आहे. ३ कोटींची उलाढाल आता १ कोटींवर आली आहे. सध्या केवळ गहू व ज्वारीचीच आवक सुरू असून त्यामुळे अन्य मालाला उठाव नाही. गहू १२५० ते २२५०, ज्वारी ११४० ते २६१२, बाजरी १०५० ते १४००, मका १०२५ ते १२८६ या दराने विक्री होत आहेत.तुरीची तेजी कायम असून तूरदाळ ४७०० ते ६४५१ रुपये प्रतिक्विंटल या दराने विक्री होत आहे. हरभरा ३२०० ते ३९१९, सोयाबीन ३३२५ ते ३४२५ रुपये आणि गुळ १९५० ते २२९९ रुपये प्रतिक्विंटल या दराने विक्री होत आहेत.
मालाची आवक मंदावली
By admin | Updated: April 12, 2015 01:02 IST