शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादकांना अच्छे दिन !

By admin | Updated: June 23, 2014 00:24 IST

लातूर : देशात मोदी सरकार स्थापनेनंतर ‘अच्छे दिन वाले है’ अशा चर्चेला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे़

लातूर : देशात मोदी सरकार स्थापनेनंतर ‘अच्छे दिन वाले है’ अशा चर्चेला आता पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे़ कारण अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला भाजीपाल्याचे भाव अचानक कडाडल्याने आर्थिक फटका सहन करावा लागत आहे़ लातुरात आठवडाभरात पालेभाज्यांचे भाव जवळपास तिप्पट वाढले आहेत़ परिणामी, किचन बजेट कोलमडले असून मूग, मसूर व तुरीच्या डाळीचेही भाव वाढले आहेत़ भाजीपाल्याला चांगला भाव मिळत असल्याने उत्पादकांसाठी ‘अच्छे दिन’ असले तरी ग्राहकांसाठी मात्र ‘बुरे दिन’ सुरू झाले आहेत़दैनंदिन आहारात जीवनावश्यक असलेल्या पालेभाज्यांचे वाढ आठवडाभरात मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्राहकांतून संताप व्यक्त केला जात आहे़ भेंडी, दोडका, कारले, बटाटे, कांदे, गवार, पालक, शेपू, मेथी आदी पालेभाज्यांचे दर जवळपास तीन पटीत वाढले आहेत़ आठवडाभरापूर्वी किरकोळ बाजारात १० ते २० रूपये प्रतिकिलो विकणाऱ्या भाज्यांचा भाव सध्या ६० ते ८० रूपये किलोप्रमाणे सुरू आहे़ दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात दुप्पट वाढ मिळत असली तर प्रत्यक्षात ग्राहकांना मात्र तिप्पट वाढीने महागाईचा सामना करावा लागत आहे़ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले भाजीमार्केट येथे भाजीपाल्याची आवक घटली आहे़ आवक कमी व मागणी जास्त असल्याने दरवाढीचा चटके सुरू झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे़ (प्रतिनिधी)बाजारात भाजीपाल्याचे भाव आठवडाभरातच कडाकडले. पंधरा दिवसांपूर्वी १० रूपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या भाज्या ६० ते ८० रूपये किलोप्रमाणे आहेत़ पालक, मेथी, शेपूची जुडी १५ ते २० रुपयांना विक्री होत आहे. शिवाय, वांगे ६० रुपये, बटाटे २० ते ३०, कांदा १० ते २०, गवार ६० ते ८०, ढोबळी मिरची ४० ते ६०, शेवगा शेंग ४० रुपये, चवळी शेंग ६० ते ७० रुपये, कोबी ४० रुपये, टोमॅटो २० रुपये, दुधी भोपळा ३० ते ४०, काकडी ३० ते ४० रुपये किलो असे दर आहेत. १५ दिवसांपूर्वी बहुतांश भाज्या १५ ते २० रुपये किलोप्रमाणे मिळत होत्या. भाजीपाल्याची किरकोळ विक्रीही चढ्या दराने केली जात आहे.