शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या रोहन टाक याची राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 00:32 IST

औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू रोहन टाक याने जबरदस्त कामगिरी करताना सलग दुसºया वर्षी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन कामगिरी केली. अकोला येथे नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रोहन टाक याने हरियाणाच्या खेळाडूला धूळ चारताना सुवर्णपदकावर कब्जा मिळवला. रोहन टाक याने या स्पर्धेत १९ वर्षांखालील ८१ ते ९१ किलो वजन गटात आपला विशेष ठसा उमटवताना केंद्रीय विद्यालय, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशच्या खेळाडूंना धूळ चारताना दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली.

ठळक मुद्देअकोला येथे जिंकले सुवर्ण : महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून देण्यात निर्णायक योगदान

औरंगाबाद : औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू रोहन टाक याने जबरदस्त कामगिरी करताना सलग दुसºया वर्षी राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गोल्डन कामगिरी केली. अकोला येथे नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत रोहन टाक याने हरियाणाच्या खेळाडूला धूळ चारताना सुवर्णपदकावर कब्जा मिळवला.रोहन टाक याने या स्पर्धेत १९ वर्षांखालील ८१ ते ९१ किलो वजन गटात आपला विशेष ठसा उमटवताना केंद्रीय विद्यालय, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशच्या खेळाडूंना धूळ चारताना दिमाखात अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीतही रोहन टाक याने त्याचा हरियाणाच्या प्रतिस्पर्ध्यांवर शक्तिशाली ठोशांचा वर्षाव करताना ५-0 अशा गुण फरकाने विजय मिळवताना सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेत रोहन टाक याच्याशिवाय अकोला येथील अजय पेंडूर (४९ किलो), राहील सिद्दीकी (६९ किलो) आणि पुणे येथील आकाश मनारे (६0 किलो) यांनीदेखील महाराष्ट्रासाठी सुवर्णपदके जिंकली.विशेष म्हणजे रोहन टाक याचे राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेतील हे सलग दुसरे सुवर्णपदक ठरले. त्याने याआधी गतवर्षी ग्वाल्हेर येथील शालेय राष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. रोहन टाक याची भारतीय संघातील निवडही थोडक्यात हुकली होती. औरंगाबाद येथील साईच्या पश्चिम विभागीय केंद्रात झालेल्या संभाव्य भारतीय संघाच्या शिबिरात त्याची निवड झाली होती आणि अंतिम फेरीत त्याला सेनादलाच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध अवघ्या १ गुणाने निसटता पराभव पत्करावा लागला होता. रोहन टाकने सातारा येथे राज्यस्तरीय फेडरेशन स्पर्धा आणि अकोला येथील शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. विशेष म्हणजे रोहन टाक याने गोल्डन कामगिरी करताना अकोला येथील राष्ट्रीय स्पर्धेत १९ वर्षांखालील गटात महाराष्ट्राला विजेतेपद पटकावून देण्यात निर्णायक योगदान दिले. रोहन टाक याला एनआयएस प्रशिक्षक सोनू टाक व राहुल टाक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे उपाध्यक्ष व औरंगाबाद शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, उपाध्यक्ष केजल भट्ट, औरंगाबाद जिल्हा आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे, उपाध्यक्ष विनोद नरवडे, उदय डोंगरे, कोषाध्यक्ष आरोह बर्वे, प्रदीप खांडरे, नीरज भारसाखळे आदींनी रोहन टाक याचे अभिनंदन केले.