हस्तपोखरी : रासायनिक खताऐवजी शेतकरी शेणखताला पसंती देत असल्याने यंदा शेणखाताचा भाव चांगलाच वाढला आहे. आगमन काही दिवसांत होणार याचे संकेत मिळताच शेतकरी मशागतीच्या कामाला लागला आहेत. आगामी दिवसांत खत लागेल पण; ते महाग मिळेल. खताची चढ्या भावाने विक्री, नको त्या खतांचा पुरवठा, वेळेवर खत न मिळणे आदी कारणांमुळे शेतकरी शेणखताकडे वळला आहे. यामुळे शेणखताला चांगला भाव आला आहे. गतवर्षी १३०० रुपये ट्रॉली मिळणारे शेणखत यावर्षी १६०० ते १८०० रुपये प्रतिट्रॉली मिळत आहे.भरवशाचे खत म्हणून शेणखत खरेदी करण्यासाठी शेतकरी पुढे येत आहे. याचा परिणाम शेणखताच्या किमतीवर झाला आहे. विशेष म्हणजे शेणखत हे उत्पन्नाच्या दृष्टीने रासायनिक खतापेक्षा सरस आहे. शिवाय कोणताही दुष्परिणाम पिकावर व जमिनीवर होत नाही.
शेणखताला आला सोन्याचा भाव
By admin | Updated: June 12, 2014 01:39 IST