शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सोने खरेदीदार आयकरच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:51 IST

मागील दोन वर्षांत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सोने खरेदी करणा-या ग्राहकांची यादी शहरातील ज्वेलर्सने आयकर विभागाकडे सपूर्द करणे सुरू केले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मागील दोन वर्षांत ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सोने खरेदी करणा-या ग्राहकांची यादी शहरातील ज्वेलर्सने आयकर विभागाकडे सपूर्द करणे सुरू केले आहे. मागील १५ दिवसांत २५ पेक्षा अधिक ज्वेलर्सने त्यांच्याकडील ग्राहकांची नावे व बिले विभागाला दिली आहेत. दिवाळीनंतर उर्वरित ज्वेलर्स यादी करण्याच्या कामात लागले आहेत. यामुळे २ लाखांपर्यंत नगदीमध्ये सोने खरेदी करणारे व त्यापेक्षा अधिक रकमेचे धनादेशद्वारे सोने खरेदी करणारे आयकर विभागाच्या रडारवर येत आहेत.आॅगस्ट महिन्यात आयकर विभागाने शहरातील २५० पेक्षा अधिक लहान-मोठ्या ज्वेलर्सला पत्रे पाठविली होती. यात आयकर कायदा १९६१ च्या १३३ (६) या नियमानुसार ज्वेलर्सकडून माहिती मागविण्यात आली होती. ज्या ग्राहकांनी ५० हजार ते १ लाख ९९ हजार ९९९ रुपयांदरम्यान सोने, दागिने खरेदी केले. तसेच ज्यांनी २ लाखांपेक्षा अधिक रकमेचे सोने धनादेश देऊन खरेदी केले अशा ग्राहकांची यादी मागविण्यात आली होती. यात वर्षभरात दोन, तीन, चार टप्प्यांत जरी सोने खरेदी केले असेल व त्यांची रोख रक्कम ५० हजारांपेक्षा अधिक होत असेल अशा ग्राहकांची नावे ज्वेलर्सने द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मागील दोन वर्षांतील खरेदीदारांची यादी देणे ज्वेलर्सला बंधनकारक होते. २५ पेक्षा अधिक ज्वेलर्सने त्यांच्याकडील ग्राहकांची यादी आणून दिली आहे.आता सोने खरेदी करणारे आयकर विभागाच्या रडारवर येत आहेत. यातून आयकर न भरणारे ग्राहकांना शोधून त्यांना आयकर भरण्यासाठी नोटीस पाठविण्यात येणार आहे.