शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरीचा प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: June 13, 2017 00:40 IST

नांदेड : गोदावरी शुद्धीकरणासाठी महापालिकेने पाठवलेल्या एक कोटी २९ लाख रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली नसल्याचा आरोप केला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गोदावरी नदी प्रदूषणास जबाबदार असल्याचा ठपका ठेवत महापौर व आयुक्तांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिल्यानंतर या प्रक्रियेला वेग आला आहे. त्याचवेळी महापौरांनी मात्र गोदावरी शुद्धीकरणासाठी महापालिकेने पाठवलेल्या एक कोटी २९ लाख रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली नसल्याचा आरोप केला आहे.पर्यावरणमंत्री रामदास कदम हे ९ जून रोजी नांदेड दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी नदीघाटाची पाहणी केली. गोदावरी नदीत थेट मिसळणारे १९ नाले पाहून त्यांनी संताप व्यक्त करत महापौर आणि आयुक्तावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानंतर रविवारी पर्यावरण विभागाच्या एका पथकाने नांदेडमध्ये येत गोदावरीतील पाण्याचे नमुने घेतले आहेत. या नमुन्यांच्या अहवालानंतर पर्यावरण कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. त्याचवेळी सोमवारी आ. हेमंत पाटील यांनीही या विषयावर गतवर्षी - पासून आपण भाविकांच्या श्रद्धेचे स्थान असलेल्या गोदावरी शुद्धीकरणाचा प्रश्न विधानसभेत मांडल्यानंतर पर्यावरणमंत्र्यांनी तत्कालीन आयुक्त सुशील खोडवेकर, जिल्हाधिकारी सुरेश काकाणी तसेच पर्यावरण विभागाचे सचिव मालिनी शंकर यांची बैठक घेवून गोदावरी शुद्धीकरणाचे आदेश दिले. तत्कालीन आयुक्तांनी तीन महिन्यांत गोदावरी शुद्धीकरणाचे काम पूर्ण होईल, असे सांगितले होते. मात्र आज वर्ष उलटले तरीही गोदावरीची स्थिती ‘जैसे थे’ च आहे. या परिस्थितीस जबाबदार असलेल्या महापौर आणि आयुक्तांवर गुन्हे दाखल होतील, असेही त्यांनी सांगितले. दुसरीकडे महापौर शैलजा स्वामी यांनी मात्र गोदावरी शुद्धीकरणासाठी २०१५-१६ च्या १४ व्या वित्त आयोगातून एक कोटी २९ लाखांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. मात्र या प्रस्तावास शासनाने मंजुरी दिली नसल्यामुळे काम रखडल्याचे सांगितले. पर्यावरणमंत्री कदम यांनी गतवर्षी मुंबईत घेतलेल्या बैठकीस महापौरांना निमंत्रित केले नव्हते. तसेच त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार महापौरांशी केला नाही. त्यामुळे महापौरांना जबाबदार धरण्याची घाई करत शिवसेना महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकारण करीत असल्याचा आरोप महापौर शैलजा स्वामी यांनी केला. इतकेच नव्हे, तर शासनाकडून नांदेड महापालिकेस कोणताही निधी दिली जात नाही. शासनाकडे अनेक निधी थकित आहेत. नांदेड महापालिकेबाबत शासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप केला. या परिस्थितीतही गोदावरी शुद्धीकरणासाठी १५ मे २०१७ रोजी राष्ट्रीय नदीकृती योजनेअंतर्गत टाकलेल्या मलवाहिन्या दुरुस्तीसाठी ५६ लाखांची निविदा मंजूर केल्याचे सांगितले. हे काम लवकरच होईल, असेही त्या म्हणाल्या.