शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नदी पैठणमध्ये दूषित

By admin | Updated: July 4, 2017 05:15 IST

आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना गोदावरीच्या दूषित झालेल्या पाण्यात यंदा पवित्र स्नान करावे लागणार आहे. जायकवाडी

संजय जाधव/लोकमत न्यूज नेटवर्कपैठण (जि. औरंगाबाद) : आषाढी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना गोदावरीच्या दूषित झालेल्या पाण्यात यंदा पवित्र स्नान करावे लागणार आहे. जायकवाडी धरणावर असलेला जलविद्युत प्रकल्प महिनाभरापासून तांत्रिक अडचणीने बंद पडल्याने गोदावरी पात्रात महिनाभरापासून पाणी साचले असून, त्यात सांडपाणी येत आहे. गोदापात्रातील पाण्यावर हिरवट व दुर्गंधीयुक्त असा तवंग दाटला आहे. या पाण्यात स्नान केल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने हे पाणी खाली सोडून द्यावे व वारकऱ्यांसाठी शुद्ध पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे. जायकवाडी धरणावर असलेला जलविद्युत प्रकल्प ४ जूनपासून बंद पडला आहे. त्यामुळे धरणातून गोदावरीत व पुन्हा धरणात पाणी लिफ्ट करण्याची प्रक्रिया थांबली आहे. सांडपाण्याचे दहा नाले गोदावरीच्या पात्रात येतात. दहा नाल्यांचा गोदावरी संगमपैठणमधील सांडपाणी वाहून आणणारे १० नाले दररोज लाखो लीटर घाण पाणी आणून सोडत आहेत. सोबतच रोज दशक्रिया विधीची हजारो किलो रक्षा पात्रात विसर्जित करण्यात येते. दूषित पाण्यात स्नान केलेल्या भाविकांना अंगास खाज येणे, अंगावर लाल पुरळ उठणे, अंगार होणे अशा विविध त्वचा आजारास सामोरे जावे लागते. जायकवाडी धरणावरील विद्युत प्रकल्पाची दुरुस्ती सुरू असून त्यासाठी आठ दिवस लागतील, असे जलविद्युत प्रकल्पाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विद्याधर लोणीकर यांनी सांगितले. गोदावरीच्या पात्रात पैठण शहराचे सांडपाणी नाल्याद्वारे मोठ्या प्रमाणात येऊन मिसळते. त्यामुळे पाण्याचे युट्रॉफिकेशन (शेवाळीकरण) वाढले, अशी माहिती धरण अभियंता अशोक चव्हाण यांनी या वेळी दिली.