बीड : खासगी शिक्षण संस्थांच्या प्रलंबित मागण्यांकडे लोकप्रतिनिधिींचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा शिक्षण बचाव कृती समितीने लढा उभा केला आहे. याअंतर्गत शनिवारी रात्री ११ वाजता एकाचवेळी ठिकठिकाणी आमदारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना निवेदन देत झोपमोड आंदोलन करण्यात आले.आ. अमरसिंह पंडित, आ. विनायक मेटे यांच्या निवासस्थानी जाऊन शिक्षण बचाव कृती समितीने त्यांना निवेदन दिले. यावेळी अध्यक्ष दीपक घुमरे, प्रा. सुशीला मोराळे, जे. एम. पैठणे, उत्तम पवार, गोविंद वाघ, सुभाष पवळ, प्रा. सत्येंद्र पाटील, डी. टी. सोनवणे, जितेंद्र डोंगरे, चंद्रकांत मुुळे, अशोक लोढा, विनयकुमार केंडे यांची उपस्थिती होती. केजमध्ये आ. प्रा. संगीता ठोंबरे यांच्या घरावर शिक्षण बचाव कृती समितीने धडक दिली. यावेळी हलगीनादही केला. हारुण इनामदार, राहुल सोनवणे, ईश्वर मुंडे, एम. डी. घुले उपस्थित होते. गेवराईत आ. अॅड. लक्ष्मण पवार, आष्टीत आ. भीमराव धोंडे तर माजलगावात आ. आर. टी. देशमुख यांना निवेदन दिले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)२८ आॅगस्ट २०१५ चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा, अनुदान घोषित शाळांना आर्थिक तरतूद करावी, खासगी शिक्षण संस्थांची स्वायतत्ता कायम ठेवावी, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा अहवाल त्वरीत मंजूर करावा, २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क अदा करावे, आश्रमशाळा शिक्षकांचे वेतन सुरू कराव, शिक्षण व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळाबाह्य कामे न देणे आदी मागण्यांचा समावेश आहे.खासगी शिक्षण संस्थांच्या विविध मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. लोकप्रतिनिधींनी याकडे गांभिर्याने पहावे यासाठी झोपमोड आंदोलन केले आहे. ३० रोजी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलनाची धार तीव्र करु.- दीपक घुमरे, अध्यक्ष, जिल्हा शिक्षण बचाव कृती समिती.
आमदारांच्या घरी जाऊन निवेदन
By admin | Updated: November 16, 2015 00:39 IST