शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

‘संत एकनाथ कारखाना’ घायाळ कंपनीला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 00:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची साडेसाती काही संपता संपेना, असे झाले आहे. नाशिक येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याची साडेसाती काही संपता संपेना, असे झाले आहे. नाशिक येथील शीला अतुलटेक शुगरने कारखाना सुरळीत चालू करून महिनाभराचा कालावधी लोटत नाही तोच हा कारखाना पुन्हा यापूर्वी करार केलेल्या सचिन घायाळ कंपनीस चालविण्यास द्यावा, असे आदेश साखर आयुक्तांनी दिले आहेत.दरम्यान, साखर आयुक्तांनी दिलेल्या निर्णयास तातडीने न्यायालयात आव्हान दिले असून, संत एकनाथ आम्हीच चालवू, असे विद्यमान चेअरमन तुषार शिसोदे यांनी ठामपणे सांगितले आहे.संत एकनाथ सहकारी साखर कारखाना मे. सचिन घायाळ कंपनीस २०१४/१५ ला तत्कालीन संचालक मंडळाने पुढील १८ वर्षे चालविण्यासाठी सहभागी तत्त्वावर चालविण्यासाठी दिला होता. याबाबतचा करार ३ आॅगस्ट, २०१५ रोजी झाला होता.या करारास राज्य शासनाने ११ सप्टेंबर २०१५ रोजी मान्यता दिली होती. या करारानुसार वाद निर्माण झाल्यास साखर आयुक्तांनी लवादाची भूमिका पार पाडावी, असे नमूद केलेले आहे.मे. सचिन घायाळ कंपनीने दोन गळीत हंगाम करून नंतरचा गळीत हंगाम केला नाही. यानंतर संचालक मंडळाच्या झालेल्या निवडणुकीत सत्तांतर होऊन कारखाना आ. संदीपान भुमरे यांच्याकडून तुषार शिसोदे यांच्या ताब्यात आला.यानंतर कारखाना गळीत हंगाम न करता कारखाना बंद ठेवल्याने करारातील अटी व शर्तींचा भंग झाल्याने कारखान्यास ७६ कोटी रुपये सचिन घायाळ यांनी भरपाई द्यावी, असा दावा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या वतीने साखर आयुक्त संभाजी कडू पाटील यांच्याकडे दाखल केला होता.याबाबत गेल्या वर्षभरापासून सुनावनी सुरू होती. याबाबत संत एकनाथचे चेअरमन तुषार शिसोदे यांनी बाजू मांडली की, सचिन घायाळ यांनी गळीत हंगाम करण्यास नकार दिल्याने तालुक्यातील शेतकरी व कारखान्याचे सभासद यांचे नुकसान होणार होते.यामुळे गळीत हंगाम सुरू करावा म्हणून सचिन घायाळ कंपनीकडे पाठपुरावा केला; परंतु त्यांनी दाद न दिल्याने कारखान्याच्या २६ सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एकमुखाने सचिन घायाळ कंपनीचा करार रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.करार रद्द करण्याची नोटीस या कंपनीस बजावली. या नोटीसला या कंपनीने उत्तर दिले नाही. यानंतर १० एप्रिल २०१७ रोजी घायाळ कंपनीचा करार रद्द केला.यानंतर आम्ही नाशिक येथील शीला अतुलटेक कंपनीस शेतक-यांचे हित लक्षात घेऊन कारखाना चालविण्याची विनंती केली. या कंपनीने कोट्यवधी रुपये लावून कारखाना चालू केला.कारखाना गळीत हंगामास परवानगी द्यावी यासाठी शासनाकडे अर्ज केला आहे, असेही ते म्हणाले.