शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार रुपये द्या अन् शहरात प्रवेश करा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 00:23 IST

दूरवरून जाण्याऐवजी बीड शहरातून जायचे असेल तर एक हजार रुपये द्या अन् शहरात प्रवेश करा, असा अनोखा फंडा महामार्ग पोलिसांकडून सध्या राबविला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दूरवरून जाण्याऐवजी बीड शहरातून जायचे असेल तर एक हजार रुपये द्या अन् शहरात प्रवेश करा, असा अनोखा फंडा महामार्ग पोलिसांकडून सध्या राबविला जात आहे. आपली दिवाळी गोड साजरी करण्यासाठी ट्रकचालकांची आर्थिक लूट केली जात आहे. याचा फटका शहरवासियांना सहन करावा लागत आहे.सोमवारी सायंकाळी बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक शाखेच्या एका महिला कर्मचा-यास ट्रकचालकाने शिवीगाळ केल्याची घटना उघडकीस आली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी हा ट्रक मुख्यालयात जमा केला. ही घटना केवळ महामार्ग पोलिसांच्या दिवाळीतील गोडधोड ‘वसुली’मुळेच घडली. वास्तविक पाहता शहरातील बिंदुसरा नदीवरील पूल अवजड वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे अवजड वाहतूक ही गढी व मांजरसुंबा मार्गे वळविण्यात आली आहे. तसेच काही वाहने महामार्गावरील वळणरस्त्यावरील जातात; परंतु सोमवारी सायंकाळी शहरात आलाच कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. यासाठी केवळ महामार्ग पोलीस जबाबदार असल्याचा आरोप सर्वसामान्यांतून होत आहे.दरम्यान, काही महिन्यांपासून बीड शहरातील वाहतूक बंद झाल्यामुळे महामार्ग पोलिसांची जोरात ‘दिवाळी’ सुरू आहे. रात्री व भल्या पहाटे महामार्गावर ट्रक अडवून त्यांच्याकडून खुलेआम कारवाईच्या नावाखाली वसुली केली जात आहे. ज्या ट्रकचालकांजवळ नियमानुसार कागदपत्रे आहेत, त्यांना वेगवेगळ्या त्रुटींच्या नावाखाली कारवाईची भीती दाखविली जात आहे. त्यांना शहर प्रवेशास बंदी करून गढी अथवा मांजरसुंबा मार्गे दूरचा मार्ग अवलंबिण्यास भाग पाडले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.