औरंगाबादकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मिटणार असून मराठवाड्यातील बेरोजगार तरुणांचा रोजगारासाठी हे महाविकास आघाडी सरकार धाडसी निर्णय घेऊन महाराष्ट्राला समृद्ध करण्यासाठी वचनबद्ध आहे. पदवीधरांच्या सर्वांगीण विकासासाठी पुन्हा एकदा सतीश चव्हाण यांना मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले. सतीश चव्हाण म्हणाले की, मराठवाड्यातील पदवीधर भाजपवाल्यांना चारी मुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाही. नुसत्या घोषणा करायच्या आणि मुंबईला जाऊन फायली अडवयाच्या अशा फसव्या कुरापती भाजप सरकारच्या कार्यकाळात झाल्या. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे म्हणाले की, भाजपचे आमदार आता महाविकास आघाडीत प्रवेश घेण्यास इच्छुक असून, राज्यातील सरकार कोसळण्याची आरोळी ठोकत आहे. शरद पवार यांनी बांधलेली ही महाविकास आघाडी असून, याच आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करण्याचे आवाहन डॉ. काळे यांनी केले. मराठवाड्यातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंनी सतीश चव्हाण यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
---- कॅप्शन : महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ झालेल्या सहविचार सभेत उपस्थित पालकमंत्री सुभाष देसाई, विनोद घोसाळकर, अंबादास दानवे, कैलास पाटील आदी.