उस्मानाबाद : सलग तीन वर्षांपासून जिल्ह्यामध्ये अत्यल्प पर्जन्यमान होत असल्याने सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. नापिकीने बळीराजा हैराण झाला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुष्काळग्रस्तांना मतद द्यावी, या प्रमुख मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आ. मधुकरराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवत हे सरकार उद्योगपती धार्जिणे असल्याचा आरोप केला. जिल्ह्यामध्ये सरासरीच्या पन्नास टक्केही पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हाती लागले नाही. आणि रबीचीही शाश्वती नाही. पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुष्काळग्रस्तांसाठी मदत द्यावी, या मागणीसाठी बुधवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. मधुकरराव चव्हाण यांनी शेतकरी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या करीत असताना शासन मात्र, ठोस उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला. याप्रसंगी अन्य पदाधिकाऱ्यांचीही भाषणे झाली. त्यांनीही सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. आंदोलनामध्ये जिल्हा अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अॅड. धीरज पाटील, उपाध्यक्ष सुधाकर गुंड, विश्वास शिंदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, सभापती बाबूराव राठोड, प्रकाश चव्हाण, जि.प. सदस्य दीपक जवळगे, प्रशांत चेडे, समीयोद्दीन मशायक, राजेंद्र शेरखाने, सुभाषसिंह सद्दीवाल, विलास शाळू, लक्ष्मण सरडे, सय्यद इकबाल, संग्राम मुंडे, प्रकाश आष्टे, अॅड. दर्शन कोळगे, विनोद वीर, शिवाजी चौगुले, अॅड. दर्शन कोळगे, सुरेश जगताप, पटेल महेबुबपाशा याकुब, नितीन बागल, विजयकुमार सोनवणे व पदाधिकारी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या
By admin | Updated: January 22, 2015 00:43 IST