शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षात ‘जीआयएस मॅपिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 01:22 IST

शहरातील प्रत्येक मालमत्तेचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने अत्याधुनिक ‘जीआयएस मॅपिंग’या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. या कामासाठी मागील दोन वर्षांपासून जोरदार हालचाली सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रत्येक मालमत्तेचे सर्वेक्षण करण्यासाठी महापालिकेने अत्याधुनिक ‘जीआयएस मॅपिंग’या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. या कामासाठी मागील दोन वर्षांपासून जोरदार हालचाली सुरू आहेत. यामध्ये अनेक विघ्न येत असल्याने प्रशासनाने निविदा प्रक्रियाच रद्द केली होती. नवीन वर्षात या स्तुत्य उपक्रमासाठी प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात येणार आहे.महापालिकेने मागील वर्षी मालमत्ता कराचे उद्दिष्ट २३० कोटी रुपये ठरविले होते. प्रत्यक्षात वसुली ८९ कोटी ३२ लाखांपर्यंत गेली. शहरातील ४० टक्के मालमत्तांना करच लावण्यात आलेला नाही. ३५ टक्के मालमत्तांना नगर परिषदेच्या काळातील कर लावलेला आहे. आज या मालमत्तांच्या जागेवर दोन ते तीन मजली टुमदार इमारती उभ्या आहेत. मनपाच्या दप्तरी सुमारे दोन लाख मालमत्तांची नोंद आहे. त्यातील व्यावसायिक मालमत्ताधारकांकडून शंभर टक्के वसुली करण्यात येते. घरगुती मालमत्ताधारक करच भरत नाहीत. मागील काही वर्षांमध्ये मालमत्ता कराची थकबाकी ३०० कोटींपर्यंत पोहोचली आहे.महाराष्टÑ शासनाने महापालिकेने मालमत्ता कराला मुख्य आर्थिक स्रोत बनविण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकाचे सर्वेक्षण करण्यासाठी खाजगी संस्थेची अथवा कंपनीची मदत घेण्याचे दोन वर्षांपूर्वी निश्चित झाले. तातडीने निविदाही प्रसिद्ध केली. निविदा सुद्धा उघडण्यात आल्या. राज्यभरातून एकाच कंपनीने या कामासाठी आपण इच्छुक असल्याचे नमूद केले. शासकीय नियमानुसार कोणत्याही निविदा प्रक्रियेत किमान ३ निविदाधारक असणे बंधनकारक आहे. मालमत्ता कराच्या सर्वेक्षणासाठी नागपूरच्या एकाच कंपनीची निविदा आल्याने मनपाने पुन्हा निविदा प्रकाशित केली. नंतर या निविदा प्रक्रियेत राजकारण शिरले. प्रशासनाला यात बराच मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे निविदा प्रक्रियाच शेवटी रद्द करण्यात आली होती.आता नवीन वर्षात जीआयएस या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी लवकरच मनपाकडून निविदाही प्रसिद्ध होणार असल्याचे कळते. डिसेंबर अखेरपर्यंत निविदा पूर्ण झाली तर प्रत्यक्षात नवीन वर्षात कामही सुरू होईल.