शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

१३ कोटींतून मुलींचे वसतिगृह

By admin | Updated: April 27, 2015 01:00 IST

लातूर : १ हजार प्रवेश क्षमता असलेल्या वसतिगृहाच्या वास्तूनंतर आता सामाजिक न्याय भवनाच्या दोन एकर जागेत खास मुलींसाठी १२ कोटी ७४ लाखांतून वसतिगृहाच्या दोन भव्य वास्तू साकारत आहेत

लातूर : १ हजार प्रवेश क्षमता असलेल्या वसतिगृहाच्या वास्तूनंतर आता सामाजिक न्याय भवनाच्या दोन एकर जागेत खास मुलींसाठी १२ कोटी ७४ लाखांतून वसतिगृहाच्या दोन भव्य वास्तू साकारत आहेत. जिल्ह्यातील २२ पैकी १५ वसतिगृहांना स्वत:च्या इमारती असून, दोन वसतिगृहांचे काम सुरू आहे. तर दोन वसतिगृहांसाठी जागा खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे आता केवळ तीन वसतिगृहांना स्वत:च्या इमारतीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.सामाजिक न्याय विभागाची जिल्ह्यात २२ वसतिगृहे आहेत. लातूर शहरात १ हजार क्षमतेच्या वास्तूमध्ये मुला-मुलींचे प्रत्येकी दोन वसतिगृह आहेत. शहरातील अन्य दोन मुलींच्या वसतिगृहासाठी स्वत:ची इमारत नव्हती. भाड्याने घेतलेल्या इमारतीत मुलींच्या राहण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या साडेसहा एकर जागेतील दोन एकर जागेमध्ये मुलींच्या दोन वसतिगृहांसाठी दोन वास्तू तयार होत आहेत. प्रत्येकी ६ कोटी ४० लाख रुपये खर्च करून दोन वास्तू तयार केल्या जात आहेत. तळमजल्यासह दोन मजल्यांची सामाजिक न्याय भवनाच्या वास्तूला शोभेल अशाच याही वास्तू डालडा फॅक्टरीच्या जागेत साकारत आहेत. शासनाने समाजकल्याण विभागाला हा निधी वितरीत केला असून, सामाजिक न्याय विभागाकडून वास्तूचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. लातूर तालुक्यातील ६, औसा २, निलंगा २, उदगीर २, अहमदपूर २, रेणापूर १ अशा १५ वसतिगृहांच्या इमारती सामाजिक न्याय भवनाच्या जागेत आहेत. आता लातूर शहरात वसतिगृहासाठी दोन वास्तू तयार होत आहेत. राज्य शासनाकडून प्रती वास्तूसाठी ६ कोटी ४० लाख रुपये असे एकूण १२ कोटी ७४ लाखांचा निधी मिळाला आहे. या वास्तूमध्ये मुलींच्या निवासाची सोय केली जाणार आहे. तर अहमदपूर व देवणी येथे वसतिगृहासाठी जागा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे आता भाड्याच्या जागेत वसतिगृह राहणार नाहीत. स्वत:च्या इमारतीत सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह असतील. केवळ तीन वसतिगृहांसाठी भाड्याने इमारत असेल, अशी माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त संजय दाणे यांनी दिली. शहरात मुलींना राहण्याची सोय नसल्यामुळे गळती होती. समाजकल्याणने वसतिगृहाची सोय केल्याने गळती थांबेल. (प्रतिनिधी)