शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 00:02 IST

महसूल प्रशासनाने २0१२ पासून जिल्ह्यात १६९ शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी केल्या आहेत. या शेतकरी कुटुंबांना भेटी देवून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास १३३ अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महसूल प्रशासनाने २0१२ पासून जिल्ह्यात १६९ शेतकºयांनी आत्महत्या केल्याच्या नोंदी केल्या आहेत. या शेतकरी कुटुंबांना भेटी देवून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी जवळपास १३३ अधिकारी व कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे.हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढतेच आहे. आतापर्यंत १६९ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. २0१२ पासून आजपर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्येची नोंद १६९ एवढी आहे. यापैकी १३४ शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रस्ताव शासकीय मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तर २९ शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत मिळू शकली नाही. यामध्ये २0१२ मध्ये ३, २0१३ मध्ये २, २0१४ मध्ये ३१, २0१५ मध्ये ४१, २0१६ मध्ये ४९ शेतकरी आत्महत्या झाल्या होत्या. तर २0१७ मध्ये आॅक्टोबरमध्येच शेतकरी आत्महत्यांचा आकडा ४३ वर पोहोचलेला आहे. त्यामुळे शेतकºयांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे चित्र आहे. शेती ही निसर्गावर अवलंबून असल्याने नापिकी, इतर कारणांमुळे शेतकºयांना कर्जफेडही शक्य होत नाही. शिवाय लग्नकार्य, मुलांचे शिक्षण व इतर कामांसाठी हाती दमडीही उरत नाही. मागील चार ते पाच वर्षांत निसर्गासमोर शेतकरी हतबल झालेला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी आवर्षणाच्या फेºयात अल्पभूधारक व कोरडवाहू शेतकºयांना या चक्रातून बाहेर पडणे शक्य होत नाही. त्यामुळे अशा कुटुंबांना तोकड्या शासन मदतीवर दिलासाही मिळत नाही.