शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

घाटीत कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्याने वर्षभरात झाले सहाशे गर्भपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 20:21 IST

गर्भपात हा स्त्रीचा हक्क आहे, हे अनेकांना माहीतच नाही.

औरंगाबाद : गर्भपात म्हटले की, दबक्या आवाजात उल्लेख केला जातो. मुलगी नको म्हणून गर्भपात केल्याच्या संशयित नजरेनेही पाहिले जाते; परंतु गर्भपात हा स्त्रीचा हक्क आहे, हे अनेकांना माहीतच नाही. कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्याने गर्भपात केले जातात. एकट्या घाटी रुग्णालयात वर्षभरात सहाशे गर्भपात होत असल्याचे समोर आले आहे.

अनधिकृत गर्भपात हा समाजासाठी चिंतेचा विषय आहे. यापूर्वी अनेक घटनांतून अवैधरीत्या गर्भपात होत असल्याचा पर्दाफाश झालेला आहे. गर्भलिंग निदान कायद्याचा भंग करून गर्भपाताची दुकानदारी काहींकडून केली जाते. अशांवर आरोग्य विभागाची, पोलीस प्रशासनाची करडी नजर असते. एकीकडे ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे अनेक कारणांमुळे कायदेशीर, वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्भपात करण्याची वेळ येते. २० आठवड्यांपर्यंत गर्भपात हा कायदेशीर आहे.

काही प्रकरणांत न्यायालयाच्या आदेशानुसार २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात शक्य असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. गरोदरपणात सोनोग्राफी केल्यानंतर गर्भात व्यंग असल्याचे निदान झाल्यानंतरही तो वाढू दिला तर पुढे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे अशावेळी वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्भपात होतात. महिन्याला जवळपास ५० गर्भपात एकट्या घाटीत होतात. त्यासाठी आवश्यक ती तपासणी केली जाते.

ही आहेत कारणेअनेकदा गर्भनिरोधक उपाय करूनही गर्भ राहिलेला असतो, तर कधी महिला अत्याचाराची बळी असते. अनेकदा गर्भात काहीतरी दोषही आढळून येतो. त्यामुळे जन्मानंतर बाळात व्यंग राहण्याचा धोका असतो. शिवाय गर्भधारणेचा संबंधित स्त्रीला त्रास होत असेल, तिचा मानसिक छळ होत असेल, तर अशा परिस्थितीत गर्भपाताचा पर्याय निवडला जातो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

महिन्याला ५० गर्भपातघाटीत महिन्याला जवळपास ५० गर्भपात केले जातात. गर्भपात हे वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि कायदेशीर बाबी पाळून करण्यात येतात, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले.

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीWomenमहिलाpregnant womanगर्भवती महिला