शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टनमध्ये गोळी लागलेल्या नॅशनल गार्डचा उपचारदरम्यान मृत्यू; दुसऱ्याची मृत्युशी झुंज!
2
मुलींसाठी कमालीची आहे 'ही' स्कीम! केवळ व्याजातून होणार ₹४९ लाखांची कमाई, मॅच्युरिटीवर मिळतील ₹७२ लाखांचा फंड
3
VIDEO: दोस्तासाठी काहीपण... विराट कोहलीला हॉटेलवर सोडण्यासाठी खुद्द धोनीने चालवली कार
4
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
5
"मविआ फुटणार… लागलेली घरघर आता अखेरच्या टप्प्यात आलीये", भाजप नेत्याचा ठाकरेंची शिवसेना, काँग्रेसवर बाण
6
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
7
VIDEO: धोनीच्या रांचीमधील आलिशन घरात जंगी पार्टी... विराट कोहली, ऋषभ पंतने लावली हजेरी
8
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
9
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
10
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
11
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
12
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
13
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
14
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
15
गुंगीचे औषध देऊन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; स्ट्रगलिंग मॉडेलला अटक, २ साथीदारांचा शोध सुरू
16
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
17
‘गंभीर’ बट्ट्याबोळ वेळीच आवरा! भारतीय क्रिकेटची अशी पत घालवणे जास्त भयंकर अन् अक्षम्य
18
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
19
पोकळ बडबड करून भाजप, मोदींशी कसे लढता येईल?; कातडीबचाव आघाड्या दूर साराव्या लागतील
20
सत्तेसाठी कोण काय करेल, याचा काहीच नेम नाही; माजी राष्ट्राध्यक्षांना २७ वर्षांची शिक्षा, पण का?
Daily Top 2Weekly Top 5

घाणेवाडी-जालना जलवाहिनी लवकरच अंथरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:54 IST

जालना : नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशय ते जालना अशी जलवाहिनी अंथरण्यास मंजुरी मिळाली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशय ते जालना अशी जलवाहिनी अंथरण्यास मंजुरी मिळाली असून, लवकरच ही जलवाहिनी अंथरण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी लोकमतशी बोलताना दिली. जालना शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी निमाजकाळात १९३५ मध्ये घाणेवाडी जलाशयाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर घाणेवाडी ते जालना ही जलवाहिनी बदलण्यात आली नाही. कालौघात ही जलवाहिनी जीर्ण झाल्याने जागोजागी गळती लागून पाण्याचा अपव्यय होत असल्याचे आढळून आले. तसेच या जलाशयाची संरक्षण भिंतही काही ठिकाणी कोसळली आहे. याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी पाहणी केली. त्यानंतर जलवाहिनी अंथरण्याबाबत पालिकेचा काही दिवसांपासून पाठपुरावा सुरू असून, याला यश आल्याचे माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी सांगितले. तसेच विशेष बाब म्हणून जालना ते घाणेवाडी जलाशय अशी नवीन जलवाहिनी अंथरण्यासाठी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. याचे कामही लवकरच सुरु होणार असून, संरक्षण भिंतीची डागडुजी करण्यासह परिसरातील वृक्षारोपण आणि इतर कामांसाठी निधी तरतूद करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी दिली. घाणेवाडी जलाशय हा जालना शहरासाठी वरदान ठरलेला आहे. याचे संवर्धन करण्यासह परिसराचे सुशोभीकरणासाठी पालिका प्रशासनाच्या मदतीने आवश्यक ती पाऊले उचलली जातील, असेही नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी सांगितले.