शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दलित वस्ती निधी वाटपाला गती मिळेना

By admin | Updated: August 13, 2014 00:56 IST

उस्मानाबाद : दलित वस्त्यांच्या विकासासाठी १५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. आचारसंहिता कधी लागेल याचा नेम नाही.

उस्मानाबाद : दलित वस्त्यांच्या विकासासाठी १५ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. आचारसंहिता कधी लागेल याचा नेम नाही. त्यामुळे समाजकल्याण विभागाकडून पात्र प्रस्तावांना मान्यता घेवून निधी वर्ग करण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही सुरू आहे. मात्र, प्रशासनाच्या या प्रयत्नांना खो घालण्याचे काम काही जिल्हा परिषद सदस्यांकडून होताना दिसून येत आहे. प्रस्ताव निश्चित करण्यासाठी सदस्यांना ११ व १२ आॅगस्ट रोजी बोलावण्यात आले होते. परंतु, सदस्य गैरहजर राहिल्याने निधी वाटप लांबणीवर पडले आहे.एकीकडे विकास कामांसाठी निधी नाही, म्हणून जिल्हा परिषद सदस्यांकडून नेहमीच ओरड केली जाते. तर दुसरीकडे कोट्यवधीचा निधी उपलब्ध होवूनही तो तातडीने खर्च करण्यासाठी जी तत्परता दाखविली पाहिजे, ती दाखविली जात नाही. अशा या स्थितीमुळे वेळेत निधी खर्च होत नाही. परिणामी जिल्ह्याला वाढीव निधी मिळण्यास अडचणी येत असल्याचे प्रकर्षाने दिसून येते. दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी १५ कोटी २० लाख रूपये इतका निधी मंजूर झाला आहे. या पैशातून दलित वस्त्यांमध्ये आवश्यक सोयी-सुविधा पुरविल्या जाणार आहेत. मंजूर निधीच्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाने गटविकास अधिकाऱ्यांमार्फत प्रस्ताव मागविले असता, तब्बल साडेसातेशवर प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्या तुलनेत निधी अत्यंत तुटपुंजा आहे. गतवर्षीचा अनुभव लक्षात घेता समाजकल्याण विभाग यंदा सतर्क आहे. गतवर्षी निधी वाटप करण्यात आल्यानंतर खुद्द समाजकल्याण सभापतींनीच ‘अधिकाऱ्यांनी आपणाला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी तत्कालीन समाजकल्याण अधिकारी खुशाल गायकवाड यांची चौकशीही लागली होती. हा भुंगा यंदा आपल्या मागे लागणार नाही, याची पुरेपूर काळजी समाजकल्याण विभागाकडून घेण्यात येत आहे. सर्व सदस्यांना बोलावून प्राधान्यक्रमानुसार निधीचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी संबंधित सदस्यांना ११ आणि १२ आॅगस्ट रोजी बोलावण्यात आले होते. परंतु, बहुतांश सदस्य जिल्हा परिषदेकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे ना निधी वाटप झाले, ना प्राधान्यक्रम ठरला. त्यामुळे समाजकल्याण विभागाने पुन्हा १३ आणि १४ आॅगस्ट रोजी सदस्यांना बोलावले आहे. जोपर्यंत सदस्य येणार नाहीत, तोपर्यंत निधी वाटप करणे कठिण असल्याचे एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)