शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रमाणपत्र मिळेना; विम्यासाठी अडचण

By admin | Updated: August 11, 2014 00:25 IST

कुरूंदा : पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून राज्य शासनाने पीक विमा भरण्यास १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकरी बँकेत विमा भरण्यासाठी गर्दी करीत आहेत.

कुरूंदा : पावसाअभावी शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून राज्य शासनाने पीक विमा भरण्यास १५ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिल्याने शेतकरी बँकेत विमा भरण्यासाठी गर्दी करीत आहेत. परंतु दुबार पेरणीचे प्रमाणपत्रे दिल्याशिवाय बँकेकडून पीक विमा स्विकारला जात नाही. हे प्रमाणपत्र कृषी व महसूल प्रशासन देण्यास तयार नसल्याने पीक विम्याची मुदतवाढीची घोषणा फसवी असल्याची शेतकऱ्यांची भावना बनली आहे.वसमत तालुक्यातीलकुरूंदा परिसरात पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर दोन वेळेस पेरणी करण्याचे संकट ओढवले होते. पावसाअभावी शेतीची परिस्थिती बिकट बनल्याने पीक हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. कर्जबाजारीपणातून पेरणी केल्यानंतर पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसेच शिल्लक राहिले नाहीत. राज्य शासनाने पिकविमा भरण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंतची मुदतवाढ दिली. यासाठी जाचक अटी लागू केल्याने दुबार पेरणीचे प्रमाणपत्र लावणे गरजेचे बनले आहे. परंतु दुबार पेरणी प्रमाणपत्र जोडल्याशिवाय मध्यवर्ती बँक पीकविम्याचा अर्ज स्विकारण्यास तयार नाही. तशा प्रकारचा लेखी आदेश परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आल्याचे कुरूंदा येथील शाखेतून सांगण्यात आले. यासंबंधी मंडळ अधिकारी अंभोरे यांना विचारले असता, कृषी अधिकारी हेच दुबार पेरणीचे निकष ठरवितात. त्यांच्याकडून अगोदर दुबार पेरणीचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. त्यानंतरच तलाठी प्रमाणपत्र देतील, असे त्यांनी सांगितले. तलाठी आर.डी. राऊत यांनीही असेच सांगितले आहे. या बाबत तालुका कृषी अधिकारी कदम यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा मोबाईल आऊट आॅफ रेंज होता. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळाली नाही. सध्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या प्रमाणपत्रासाठी हालअपेष्ठा सहन कराव्या लागत आहेत. कोणालाच कार्यालयातून दुबार पेरणीचे प्रमाणपत्र दिले जात नसल्याने पीक विम्यापासून शेतकरी वंचित राहत आहेत. राज्य शासनाने नव्याने पीक विमा भरण्यास मुदतवाढ देऊन देखील त्याचा फायदा शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. फसव्या मुदतवाढीमुळे शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या प्र्रकरणाकडे नुतन जिल्हाधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देवून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)