शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

प्रतिभा सर्वांकडेच, गरज पैलू पाडण्याची

By admin | Updated: March 15, 2016 00:41 IST

औरंगाबाद : ‘प्रतिभा सर्वांकडेच असते. मात्र, पैलू पाडून तिला आणखी चमकदार करण्याची सद्य:स्थितीत गरज आहे,’ असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सोमवारी येथे केले.

औरंगाबाद : ‘प्रतिभा सर्वांकडेच असते. मात्र, पैलू पाडून तिला आणखी चमकदार करण्याची सद्य:स्थितीत गरज आहे,’ असे प्रतिपादन महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सोमवारी येथे केले.‘आयपीसीसी’, ‘सीपीटी’ आणि ‘सीए’ अंतिम परीक्षेतील गुणवंतांचा ‘लोकमत’तर्फे सत्कार करण्यात आला. ‘लोकमत भवन’ मध्ये झालेल्या गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, संपादक चक्रधर दळवी, वरिष्ठ उपाध्यक्ष ओमप्रकाश केला, सहायक उपाध्यक्ष संदीप विष्णोई, सहायक उपाध्यक्ष (फायनान्स) शैलेश चांदीवाल, ‘लोकमत समाचार’चे कार्यकारी संपादक अमिताभ श्रीवास्तव, ‘लोकमत टाइम्स’चे निवासी संपादक योगेश गोले, व्यवस्थापक (लेखा व वित्त) अंबरिश श्रॉफ, ‘आयसीएआय’च्या पश्चिम विभागाचे सदस्य उमेश शर्मा, औरंगाबाद शाखेच्या अध्यक्षा रेणुका देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘सीए’ अंतिम परीक्षेतील २२, ‘आयपीसीसी’च्या २४, तर ‘सीपीटी’च्या २०० गुणवंतांचा यावेळी गौरव करण्यात आला. ‘प्रतिभा ही सर्वांकडेच असते, परंतु त्यावर पैलू पाडण्याची गरज आहे. आपल्याला कोणत्याही विषयातील तज्ज्ञ व्हायचे नाही, तर परीक्षेच्या तीन तासांत समोर येणाऱ्या प्रश्नांची योग्य उत्तरे देण्याची आहे. परीक्षेच्या कालावधीत आपल्यातील प्रतिभेचा योग्य प्रकारे उपयोग करणारे विद्यार्थीच यशस्वी होतात,’ असा मोलाचा सल्ला बकोरिया यांनी दिला. मुलींचे वाढते प्रमाण समाधानकारकमनपा आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ‘लोकमत’ समूहाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची बकोरिया यांची ही पहिलीच वेळ होती.‘लोकमत’ समूहाच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. सीए, सीपीटी आणि आयपीसीसी परीक्षेत यशस्वी होणाऱ्यांत मुलींचे वाढते प्रमाण समाधानकारक आहे. स्पर्धा परीक्षांमधील यशस्वी विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता ‘एज्युकेशन हब’ बनण्याची औरंगाबादमध्ये क्षमता आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कठोर मेहनत आणि आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ राहण्याचा सल्ला ‘सीए’ उमेश शर्मा यांनी दिला. ‘लोकमत’कडून या विद्यार्थ्यांचा गौरव होणे ही मोठी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. रेणुका देशपांडे यांनीही गुणवंतांचे कौतुक केले. ओमप्रकाश केला यांनी प्रास्ताविक केले. संदीप विष्णोई यांनी आभार मानले.देशाला महासत्ता बनविण्यात चार्टर्ड अकाऊंटंटचा सिंहाचा वाटा असेल, असे गौरवोद्गार राजेंद्र दर्डा यांनी काढले. ‘डीएमआयसी’ प्रकल्पामुळे भविष्यात ‘सीएं’ची मोठी गरज भासणार आहे. अशा परिस्थितीत ‘सीए’ना ‘सोल्युशन प्रोव्हायडर’ म्हणून काम करावे लागणार आहे, असे त्यांनी नमूद केले. या अभ्यासक्रमात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बदलांविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.